प्रतिनिधी...मनोज जाधव
डॉ आंबेडकर बाल विकास शिक्षण संस्थेत सौर ऊर्जा प्रकल्पाचा शुभारंभ
रुईभर : - दि 7 ऑगस्ट रोजी : डॉ आंबेडकर बाल विकास शिक्षण संस्था, रुईभर येथे सौर ऊर्जा प्रकल्पाचा मान्यवरांच्या हस्ते शुभारंभ मोठ्या थाटात झाला.
संस्थेने सौर ऊर्जा प्रकल्प 15 KW बसवला आहे. ग्रामीण भागात हा नवीन उपक्रम राबवून संस्थेने विकास भर घातली आहे. विजेचे भरमसाठ विज बिल भरावे लागत असत. प्रत्येक महिन्याला 25 ते 30 हजार रुपये बिल येत असे. या प्रकल्पामुळे वीज बिलाची बचत होऊन संस्थेची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होणार आहे. विद्यार्थ्यांना आणखी सुविधा पुरवण्यास मदत होणार आहे. प्रत्येक विषयाचे ई लर्निंग अध्यापन करण्यात हातभार लागणार आहे. ई लर्निंग अध्यापन आणखी प्रभावी राबवले जाईल. वस्तीग्रहातील मुला- मुलींनाही याचा फायदा होणार आहे. या अगोदरच वॉटर सोलर बसवून संस्थेने वसतीगृहातील विद्यार्थ्यांना गरम पाण्याची सुविधा करून दिली आहे.
डॉ आंबेडकर बाल विकास शिक्षण संस्थे-अंतर्गत जयप्रकाश विद्यालय, इंदिरा गांधी प्राथमिक शाळा, श्री स्वामी समर्थ कला विज्ञान महाविद्यालय, जिजामाता मुलींचे वस्तीगृह, जय श्रीराम मुलांचे वस्तीगृह, जनाबाई तुळशीदास जाधव वस्तीगृह या सर्व शाखांना याचा फायदा होणार आहे.
याप्रसंगी डॉ आंबेडकर बाल शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शिक्षण महर्षी श्री सुभाष दादा कोळगे, माजी जि प सदस्य रामदास आण्णा कोळगे, माजी ग्रा प सदस्य राजनारायण कोळगे, प्रशासकीय अधिकारी शिवकन्या साळुंके , श्री स्वामी समर्थ कला व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य संतोष कपाळे, इंदिरा गांधी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक नानासाहेब शेलार, पर्यवेक्षक काकासाहेब डोंगरे , शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते.
0 टिप्पण्या