📰 धाराशिव जिल्ह्यातून उदयास आलेला लोकनायक – रुग्णसेवक, शेतकरीहिताासाठी लढणारा आणि आता जनतेच्या आशीर्वादाने राजकारणात उभा राहणारा… केदार सौदागर!
सलगरा (ता. तुळजापूर) | प्रतिनिधी. मनोज जाधव
धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील सलगरा गावचा सर्वसामान्य घरातून आलेला पण असामान्य ध्येय बाळगणारा तरुण—केदार सौदागर—आज जिल्ह्यात लोकसेवेचा नवा चेहरा बनला आहे. बीए, बी.एड अशी उच्च शिक्षणे पूर्ण करूनही नोकरीच्या मागे न न लागता “समाजसेवा हीच खरी प्राणज्योत” अशी भूमिका घेत केदार यांनी आपल्या कार्याची वाटचाल सुरू केली
🔶 रुग्णसेवेतून निर्माण झाला ‘आशेचा किरण’
केदार सौदागर यांच्या नावाशी आज रुग्णसेवा हे शब्द कायमचे जोडले गेले आहेत.
हजारो रुग्णांना तात्काळ ब्लड उपलब्ध करून देणे
कॅन्सरग्रस्त रुग्णांना विविध हॉस्पिटलमध्ये नेऊन वैद्यकीय मदतीची सोय करणे
महिला प्रसूती प्रकरणांमध्ये मोफत उपचारासाठी पुढाकार
शासकीय योजनांतून आतापर्यंत 10,000 पेक्षा जास्त रुग्णांची मोफत ऑपरेशन्स पूर्ण
रुग्णसेवेची ही निस्वार्थ धडपड त्यांना धाराशिव जिल्ह्यातील “रुग्णांचा खरा भाऊ” म्हणून ओळख मिळवून देते.
🔶 शेतकऱ्यांसाठी लढणारा आघाडीचा लढवय्या
शेतकऱ्यांच्या जीवावर बेतलेल्या कर्जबाजारीपणाविरोधातील सर्वात गाजलेले आंदोलन म्हणजे
लोहारा तहसीलवरील बैलगाडी मोर्चा
या आंदोलनाने संपूर्ण महाराष्ट्राला पेटवले. हजारो शेतकऱ्यांना या चळवळीने दिशा मिळाली आणि राज्यात कर्जमाफीचे निर्णय होण्यास हातभार लागला.
चांदवड येथील बच्चू कडू यांच्या नेतृत्वातील कांदा आंदोलनातही केदार सौदागर अग्रभागी
या आंदोलनामुळे लाखो शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रति टन 2,000/- रुपये वाढीव अनुदान जमा झाले.
🔶 वनमजुरांचे ‘थकीत वेतन’ आंदोलन – तीन वर्षांचा प्रश्न एका लढ्याने मिटला
धाराशिव जिल्ह्यातील वनविभागातील रोजंदारी कामगारांचे तीन वर्षांपासून थकीत वेतन मिळत नव्हते.
केदार सौदागर यांच्या थेट नेतृत्वाखालील आंदोलनानंतर प्रशासनाला झुकावे लागले आणि हजारो वनमजुरांचे थकीत वेतन मंजूर झाले.
यामुळे या मजुरांनी दिवाळी साजरी केली—हीच त्यांची खरी कमाई!
🔶 मसनजोगी समाजासाठी दिवाळीत केलेले हटके आंदोलन – एका दिवसात रस्ता + रेशनकार्ड मंजूर
येडोळा येथील पाड्यावर राहणाऱ्या मसनजोगी समाजाला ना रस्ता, ना रेशनकार्ड.
केदार सौदागर यांनी दिवाळीच्या दिवशीच प्रत्यक्ष जाऊन हटके आंदोलन केले.
परिणाम—
तात्काळ रस्ता मंजूर
एकाच दिवशी सर्व कुटुंबांची रेशनकार्डे मंजूर
🔶 1500 निराधारांच्या योजना — “मध्यरात्री मंजुरी”
कुक्कडगाव (ता. परंडा) येथे वर्षानुवर्षे निराधार-वृद्धांच्या प्रस्तावांना मंजुरी मिळत नव्हती.
केदार सौदागर यांच्या मध्यरात्रीच्या आंदोलनामुळे तहसील प्रशासनाने एका दिवसात 1500 प्रस्ताव मंजूर करून पत्रे हातात दिली.
गावकऱ्यांनी डोळ्यांत पाणी आणून प्रतिक्रिया दिली—
“हा आमचा मुलगा… आमच्या सोसलेल्या वेदनांना आता मोकळी वाट मिळाली.”
🔶 आता सलगरा पंचायत समिती गणातून राजकारणात ‘पहिली पायरी’
समाजसेवेची वर्षानुवर्षांची भक्कम कामगिरी हातात घेऊन केदार सौदागर आता
सलगरा पंचायत समिती गणातून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार
लोकांमध्ये त्यांच्या नावापासून कामापर्यंत प्रचंड विश्वास आहे.
स्वतः केदार म्हणतात—
“आजवर समाजाची सेवा केली… आता लोकप्रतिनिधी म्हणून अधिक मोठ्या प्रमाणात काम करण्याची संधी मिळावी, एवढीच माझी विनंती.”
🔶 लोकसेवेतून नेतृत्वाकडे – धाराशिवचा उदयता चेहरा
रुग्णसेवा, शेतकरी आंदोलने, वनमजुरांचे हक्क, निराधारांची लढाई—
या सर्वांतून केदार सौदागर हे नाव आता धाराशिव जिल्ह्याच्या सामाजिक आणि राजकीय पटलावरील नवे नेतृत्व म्हणून उदयास येत आहे.
जनतेच्या अपेक्षा उंच, आणि त्यांच्या कार्याची परंपरा भक्कम—
आता सलगराच्या जनतेला आपल्या भूमिपुत्राकडून मोठ्या अपेक्षा आहेत!







0 टिप्पण्या