राजा राम मोहन राय ग्रंथालय प्रतिष्ठानच्या नोंदणीसंदर्भात माहितीपर कार्यशाळा धाराशिव येथे संपन्न
प्रतिनिधी.... मनोज जाधव
धाराशिव (प्रतिनिधी): जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, धाराशिव येथे राजा राम मोहन राय ग्रंथालय प्रतिष्ठान, कोलकाता यांच्या नोंदणीसंदर्भात माहितीपर कार्यशाळा उत्साहात पार पडली.
या कार्यशाळेचे अध्यक्षस्थान जिल्हा ग्रंथालय अधिकारी श्री. ढाकणे साहेब यांनी भूषविले. आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी ग्रंथालयांच्या नोंदणी प्रक्रियेचे महत्त्व अधोरेखित करताना सर्व वाचनालयांनी शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार नोंदणी पूर्ण करावी, असे आवाहन केले.
कार्यशाळेत आर. आर. फाउंडेशन, कोलकाता यांच्या नोंदणी प्रक्रियेविषयी सविस्तर माहिती देण्यात आली. तसेच नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे, ऑनलाइन प्रक्रिया आणि शासनाशी संबंधित नियमावली याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले.
या कार्यशाळेचे आयोजन श्री संत सावता माळी सार्वजनिक वाचनालय, देवळाली आणि आयडियल कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, धाराशिव यांच्या सहकार्याने करण्यात आले होते.
कार्यक्रमास जिल्ह्यातील विविध ग्रंथालय कार्यकर्ते, कर्मचारी व वाचनालय प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी या कार्यशाळेतून मिळालेली माहिती अत्यंत उपयुक्त ठरेल व नोंदणी प्रक्रियेला गती मिळेल, असे मत व्यक्त केले.



0 टिप्पण्या