📰 आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचा वाढदिवस मेडशिंगा येथे अनोख्या पद्धतीने साजरा
तुळजापूर : प्रतिनिधी .....मनोज जाधव
तुळजापूर मतदारसंघाचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचा वाढदिवस यावर्षी मेडशिंगा येथे अत्यंत साध्या पण सामाजिक भावनेने युक्त पद्धतीने साजरा करण्यात आला. जिल्ह्यातील सर्व कार्यकर्त्यांमध्ये त्यांच्या वाढदिवसाचा नेहमीच उत्साह पाहायला मिळतो, मात्र यावर्षी झालेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर आमदार पाटील यांनी वाढदिवसाचे औचित्य साधून सामाजिक कार्याला प्राधान्य द्यावे, असे आवाहन आपल्या कार्यकर्त्यांना केले होते.
या आवाहनाला प्रतिसाद देत भारतीय जनता पार्टी महिला आघाडीच्या कार्यकर्त्या चिंगूताई जाधव यांनी मेडशिंगा गावात साध्या व धार्मिक वातावरणात वाढदिवस साजरा करण्याचा उपक्रम राबविला.
मेडशिंगा येथील मंदिरात भजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गावातील सर्व पुरुष व महिला भजनी मंडळातील सदस्यांनी उपस्थित राहून भजनाच्या माध्यमातून आमदार पाटील यांना उदंड आयुष्य लाभावे अशी प्रार्थना केली.
हा कार्यक्रम चिंगूताई जाधव यांच्या संकल्पनेतून साकारला गेला असून, यामधून समाजातील लोकांपर्यंत सामाजिक जाणीव आणि सकारात्मक संदेश पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात आला.
या अनोख्या व साधेपणात साजऱ्या झालेल्या वाढदिवसाबद्दल कार्यकर्त्यांकडून आणि ग्रामस्थांकडून भारी प्रतिसाद व प्रशंसा मिळत आहे.



0 टिप्पण्या