Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

धाराशिव नगरपालिकेतील आजच्या उमेदवाराचा हाय होल्टेज ड्रामा कोर्टाच्या दारात


 धाराशिव :  मनोज जाधव 

धाराशिव नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 मध्ये राजकीय तापमान चांगलेच वाढले आहे. प्रभाग क्रमांक 9-ब मधील सर्वाधिक प्रतिष्ठेचे मानले जाणारे सर्वसाधारण नगरसेवक पदासाठी आम आदमी पार्टीचे उमेदवार सुरेश शिवाजी शेळके यांचे अर्ज तांत्रिक कारणांवरून निवडणूक अधिकाऱ्यांनी अवैध ठरवल्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे.


या निर्णयाविरोधात उमेदवार सुरेश शेळके यांनी दिनांक 28 नोव्हेंबर 2025 रोजी मा. जिल्हा न्यायालय, धाराशिव येथे निवडणूक याचिका दाखल केली. काल दिनांक 29 नोव्हेंबर 2025 रोजी या याचिकेवर अॅड. अजय वाघाळे यांनी उमेदवाराची बाजू जोरदारपणे मांडली.


या चर्चेनंतर जिल्हा न्यायालयाने निवडणूक अधिकाऱ्यास अर्जंट नोटीस जारी करण्याचा आदेश देत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. पुढील सुनावणी दिनांक 1 डिसेंबर 2025, सोमवार रोजी मा. जिल्हा न्यायाधीश शंकर ठुबे यांच्या न्यायालयात होणार आहे.


धाराशिवमध्ये यापूर्वीच प्रभाग क्रमांक 2, 7 आणि 14 चे वादग्रस्त प्रकरणे न्यायालयीन पातळीवर प्रलंबित असताना हे चौथे प्रकरण न्यायालयाच्या दारात पोहोचले आहे.


दरम्यान, मतदान दिनांक 2 डिसेंबर 2025 अगदी जवळ आल्याने, या याचिकेवर न्यायालय कोणता निर्णय देणार याकडे केवळ प्रभाग 9-ब च नव्हे तर संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.


निवडणूक अवघी 48 तासांवर… AAP चे शेळके कोर्टदारी! धाराशिव निवडणुकीत नवा ट्विस्ट”



“शेळके विरुद्ध निवडणूक अधिकारी! AAP चा हाय-व्होल्टेज संघर्ष आता न्यायालयात — सुनावणी 1 डिसेंबरला”



   “अवैध अर्ज की राजकीय डावपेच? AAP उमेदवार शेळके यांच्या याचिकेवर शहराची नजर”


 “धाराशिवमध्ये कोर्टाचे हातोडे वाजणार! AAP उमेदवाराचा अर्ज अवैध — निर्णय मतदानावर परिणाम करणार?”

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या