जचप्रकाश विद्यालयात आनंददायी शाळेत आर्ट ऑफ लिव्हींग द्वारे योगाचे मार्गदर्शन
रुईभर : - दि 15 नोव्हेंबर रोजी जयप्रकाश माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, रुईभर येथे दर शनिवारी आनंददायी शाळेत ऑफ लिव्हींग द्वारे योग प्रणायाम व ध्यान धारणा चे महत्व सांगण्यात आले. विद्यालयात आनंदाई शनिवार या शासनाच्या उपक्रमा प्रमाने शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा या हेतूने कार्यक्रम घेतले जातात. त्यांच्यातील कला दाखवण्याची संधी दिली जाते. आज आर्ट ऑफ लिव्हींग च्या माध्यमातून श्री लक्ष्मण काकडे धाराशिव जिल्हा, समन्वयक यांनी महत्त्वाचे मार्गदर्शन केले. ध्यानधारणा कशा पद्धतीने केली जाते, ध्यानधारणा करत असताना आई-वडिलांच्या कष्टाची आठवण, त्यांचा आदर सन्मान व कुटुंबाचा आधार आपण बनले पाहिजे याविषयी माहिती याप्रसंगी दिली.
याप्रसंगी डॉ आंबेडकर बाल शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शिक्षण महर्षी श्री सुभाष दादा कोळगे, माजी जि प सदस्य रामदास आण्णा कोळगे, माजी ग्रा प सदस्य राजनारायण कोळगे, प्राचार्य जयप्रकाश कोळगे , प्रशासकीय अधिकारी शिवकन्या साळुंके , श्री स्वामी समर्थ कला व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य संतोष कपाळे, इंदिरा गांधी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक नानासाहेब शेलार, पर्यवेक्षक काकासाहेब डोंगरे , शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते.


0 टिप्पण्या