मराठा आंदोलक ते प्रबळ राजकीय दावेदार!
धाराशिव नगरपालिकेच्या रणधुमाळीत निखिल जगतापांची उमेदवारी चर्चेत...
प्रतिनिधी....मनोज जाधव
धाराशिव – आगामी नगरपालिका निवडणुकांची चाहूल लागताच राजकीय चर्चांना वेग आला असून प्रभाग क्रमांक 17 मध्ये ‘कौन बनेगा उमेदवार’ हा प्रश्न सध्या सर्वाधिक गाजत आहे. या पार्श्वभूमीवर मराठा आंदोलनातून राज्य सरकारला अक्षरशः घाम फोडणारे निखिल सुधीर जगताप यांनी शिवसेना (शिंदे गट) कडे उमेदवारीची मागणी करताच राजकीय वर्तुळात जोरदार खळबळ उडाली आहे.
मराठा समाजाच्या हक्कांसाठी आक्रमक भूमिका घेतलेल्या आणि तळागाळातील नागरिकांसाठी सदैव उपलब्ध राहणाऱ्या निखिल जगताप यांनी सामाजिक कामाचा भक्कम पाया रचला आहे. “ज्या ठिकाणी कमी, त्या ठिकाणी आम्ही” या भूमिकेतून त्यांनी सर्वसामान्यांचा विश्वास संपादन केला असून त्यांच्याप्रती असलेला जनाधार प्रभाग 17 मध्ये ठळकपणे दिसून येतो.
पक्षश्रेष्ठींना सादर केलेली त्यांची उमेदवारीची मागणी ही केवळ वैयक्तिक नाही, तर ही जनतेची मागणी आहे, असा दावा जगताप यांनी केला. त्यांच्या या दावेदारीमुळे प्रभाग क्रमांक 17 मधील राजकीय समीकरणे एकदम बदलली असून विरोधकांमध्ये स्पष्टपणे धडधड वाढलेली दिसत आहे.
स्थानिकांच्या मते,
“निखिल जगताप यांना उमेदवारी मिळाल्यास ते विजयश्री खेचून आणतील, यात शंका नाही.”
यामुळे शिवसेना (शिंदे गट) समोरील उमेदवाराचा पेच अधिक गडद झाला आहे. एकीकडे भूमिपूत्र, आंदोलक आणि सामाजिक कार्यकर्ते अशी ओळख असलेले जगताप; तर दुसरीकडे पक्षाचे अंतर्गत गणित – या दोन्हींचा ताळमेळ कसा साधला जाईल याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.
प्रभाग 17 मध्ये जगताप यांच्या प्रवेशामुळे निर्माण झालेली चुरस ही संपूर्ण नगरपालिका निवडणुकीतील मुख्य चर्चा बनली आहे. पक्षश्रेष्ठी आता कोणता निर्णय घेणार, निखिल जगताप यांच्या दाव्याला मान्यता देणार का – हे येणारा काळच ठरवेल. मात्र एक गोष्ट निर्विवाद आहे…
👉 निखिल जगताप यांची उमेदवारी ही प्रबळ आणि प्रभावी ठरणार, हे नक्की!
धाराशिव नगरपालिकेतील या राजकीय घडामोडींवर संपूर्ण शहराची उत्सुकतेने नजर लागली आहे
---



0 टिप्पण्या