Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

चांगला आदर्श ठेवून भविष्यातील मार्ग निवडा - मा श्री सूर्यकांत भुजबळ (उपमुख्य कार्यकारी अधिकारी जि प धाराशिव )

चांगला आदर्श ठेवून भविष्यातील मार्ग निवडा - मा श्री सूर्यकांत भुजबळ (उपमुख्य कार्यकारी अधिकारी जि प धाराशिव )     

मुख्य संपादक...मनोज जाधव 9823751412

      रुईभर :- दि ७ फेब्रुवारी रोजी शिक्षणाबरोबर संस्कृती या संस्थेत जोपासले जाते हे चांगले कार्य आहे. शिक्षणाबरोबरच समाज उन्नतीचे कार्य संस्कृती करत असते. इ १० व इ १२ तील हा जीवनाचा महत्त्वाचा टप्पा असतो ही वेळ जीवनात व्यक्तिमत्व घडवण्यासाठी निर्णयाची वेळ असते. जीवन यशस्वी करण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांनी आत्मविश्वास, इच्छाशक्ती, सकारात्मक दृष्टिकोन, क्रियाशील व महत्त्वकांक्षी सारखे गुण आत्मसात करणे महत्त्वाचे आहे. जीवनात आपण कोणाचा आदर्श समोर ठेवून मार्ग निवडतो त्यावर पुढील भविष्य अवलंबून असते. आदर्श निवडताना भान ठेवणे आवश्यक आहे. जीवनात आपले ध्येय गाठायचे असेल तर आदर्श चांगला ठेवला पाहिजे. कारण त्यातूनच आपल्याला प्रेरणा भेटत असते. यापुढील जीवनाचा खडतर प्रवास सुरू होतो म्हणून प्रत्येकानी कमवा व शिका याचाही अवलंब करावा म्हणून जीवनात ज्यांच्याकडून आपल्याला प्रेरणा मिळते असाच चांगला आदर्श डोळ्यासमोर ठेवून भविष्यातील मार्ग निवडावा अशी अपेक्षा जयप्रकाश माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, रुईभर येथे जि प धाराशिव चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून इयत्ता दहावी व बारावीच्या निरोप समारंभ प्रसंगी बोलत होते.
         कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ आंबेडकर बाल विकास शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शिक्षण महर्षी श्री सुभाष दादा कोळगे होते. अध्यक्षीय भाषणात म्हणाले की आपण जीवनात शिस्तप्रिय असले पाहिजे. प्रत्येक ठिकाणी शिस्तप्रिय असाल तर आपले व्यक्तिमत्व नक्कीच चांगले समोर येते. आजच्या चुका भविष्यात अडचणी आणू शकतात या ठिकाणी मिळालेले ज्ञान व संस्काराचा जीवनात उपयोग करून गुणवान बनावे. चांगल्या पदावर विराजमान व्यक्तीचे आदर्श व गुण घ्यावेत. त्यांच्यासारखे आपण ही बनण्याचे प्रयत्न करावेत. येणाऱ्या परीक्षेत चांगले गुण घेऊन जीवन उज्वल बनवण्याची अपेक्षा व्यक्त केली. 
         प्राचार्य जयप्रकाश कोळगे यांनी प्रास्ताविक भाषण केले. त्यानी संस्थेच्या आरंभा पासून आतापर्यंतचा संघर्षमय प्रवास याप्रसंगी भाषण रूपाने मांडला. ग्रामीण भागातील मुला मुलींना शिक्षणाची व्यवस्था व्हावी म्हणून संस्था स्थापन करून विविध शाखेतून केजी ते पदवीपर्यंतच्या शिक्षणाची व्यवस्था केली.  या ठिकाणी शिस्त व संस्कार रुजवले जातात. सुसंस्कार विद्यार्थी घडवण्याचे काम येथे होते. जीवनात उच्च शिखर गाठायचे असेल तर जीवनाचा अर्थ समजून घेऊन स्पर्धा, मेहनत, वेळेचे नियोजन करणे आवश्यक आहे. जीवनात सहजासहजी काहीही मिळत नाही म्हणून जीवनाचे सोने करायचे असेल तर ज्ञानी व सुसंस्कारी बनावे अशी अपेक्षा व्यक्त केली.
         बेंबळी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक मा श्री पी पी माने इयत्ता दहावी व इयत्ता बारावीच्या निरोप समारंभ प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून बोलताना म्हणाले की या संस्थेत शिकणारा विद्यार्थी भाग्यशाली आहे. के जी ते पदवी पर्यंतचे शिक्षण एकाच संकुलात मिळते ही आंनदाची गोष्ट आहे . जीवनात असे निरोप समारंभाचा प्रसंग परत येत नाही. जीवनात कठोर परिश्रम केल्याशिवाय पर्याय नाही. जो श्रम करतो तोच टिकतो असे प्रतिपादन याप्रसंगी केले.
          माजी जि प सदस्य रामदास आण्णा कोळगे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की विद्यार्थ्यांना विद्यालयातून मिळालेल्या ज्ञानाच्या शिदोरीवर जीवन उज्वल बनवावे. सर्व गुण संपन्न होण्यास आपल्याला मदत होते. ज्ञानाच्या शिदोरीवरच जीवनाचे सोने करावे. आपल्या जीवनात कमीत कमी चुका करून समाज परिवर्तनाच्या कामात झोकून द्या. भविष्यात आपण न भरकटता योग्य दिशेने जाऊन जीवन उज्वल बनवावे. आपल्यातील शक्ती ओळखा त्या शक्तीला चालना द्या व जीवन घडवा. आपले व्यक्तिमत्व अष्टपैलू बनवा. जीवन नैराश्यात न जगता आपल्या जीवनाचे आपणच शिल्पकार बनण्याची अपेक्षा याप्रसंगी व्यक्त केली.
       कार्यक्रमाच्या प्रारंभी कुमारी तनुजा ढेरे हिने संविधानाचे वाचन केले.  .
         क्रीडा क्षेत्रात प्राविण्य मिळालेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले.
        निरोप समारंभ प्रसंगी इ १०वी तील संजना इंगळे, समृद्धी गाढवे तर इ १२ वी मधील आदिती आदटराव,  राधिका वडवले, कृष्णाली सुतार, विशाखा सुरवसे , यांनीही आपले अनुभव व्यक्त केले.
      कीर्ती रणशिंगे हिने शिक्षण महर्षी श्री सुभाष दादा कोळगे यांच्या कार्यावरती स्वय लिखित काव्य सादर केले. 
      याप्रसंगी माजी ग्रा प सदस्य राजनारायण कोळगे, श्री स्वामी समर्थ कला व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य संतोष कपाळे, इंदिरा गांधी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री नानासाहेब शेलार, वि.का.सोसायटीचे चेअरमन बाबासाहेब कोळगे, शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
      कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्री सचिन कांबळे, प्रा गणेश शेटे, श्री अभिजीत घोळवे यांनी तर आभार श्री डोंगरे के ए यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या