Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

जयप्रकाश विद्यालयाचे एन. एम. एम. एस. (NMMS) शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश

जयप्रकाश विद्यालयाचे एन. एम. एम. एस. (NMMS) शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश 

मुख्य संपादक....मनोज जाधव 9823751412

        रुईभर - जयप्रकाश माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय, रुईभर येथील एन. एम. एम. एस. (NMMS)सन - २०२४-२५ या वर्षी १९  (एकोनिस ) विद्यार्थी पास झाले आहेत. 
       या सर्व विद्यार्थ्यांचे डॉ आंबेडकर बालविकास शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शिक्षणमहर्षी सुभाष दादा कोळगे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देवून अभिनंदन करण्यात आले. 
          या यशस्वी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक NMMS विभाग प्रमुख श्री विनय सारंग, श्री डोंगरे के ए, श्री क्षीरसागर व्ही बी, श्री अभिजित घोळवे , श्री अमर कोळगे , श्री भिमराव कांबळे यांनी मौलाचे मार्गदर्शन केले.
      विद्यार्थी व शिक्षक यांनी एकही सुट्टी न घेता सतत परीश्रम घेवून हे यश संपादन केले.     
            या यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये गुंड श्रद्धा ज्ञानेश्वर, गडीकर शिवम गोविंद, कस्पटे अनुष्का गंगाराम, निर्मले समीक्षा सातलिंग, भोसले प्रांजली भीमराव, क्षीरसागर शिवकन्या बाळासाहेब, गव्हाणे ईश्वरी अशोक, शिंदे अर्पिता राजेश, पवार अश्वमेघा धनाजी, कस्पटे आदित्य बाळू, पडवळ आर्या विनोद, पवार तुकाराम हनुमंत, लांडगे अपेक्षा प्रमोद, कोळगे सिद्धी सतीश, घोडके अविष्कार तानाजी, शिंदे सृष्टी सुधीर, सावंत समर्थ बाळासाहेब, गायकवाड सायली नामदेव, आकाडे अर्णव विद्यासागर यांचे अभिनंदन करण्यात आले.          
              याप्रसंगी माजी जि प समस्य श्री रामदास आण्णा कोळगे ,  माजी ग्रा प समस्य श्री राजनारायण कोळगे ,  प्राचार्य जयप्रकाश कोळगे ,  शिक्षकवृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी उपास्थित होते.
           कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार श्री विनय सारंग यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या