रायगड येथे तीन दिवस होणाऱ आंदोलन,दिव्यांगांनी उस्फुर्त सहभाग नोंदवावा - मयुर काकडे
मुख्य संपादक...मनोज जाधव 9823751412
किल्ल्याच्या पायथ्याशी राजमाता जिजाऊ समाधी पाचाड स्थळाजवळ दिनांक २१, २२ व २३ मार्च रोजी तीन दिवसीय आंदोलन होणार आहे. दिव्यांगांना सहा हजार रुपये महिना मिळावा दिव्यांगांना घरकुल मिळावे दिव्यांगांना राजकीय आरक्षण मिळावे या प्रमुख मागण्यासाठी बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील हजारो दिव्यांग आमरण उपोषण करणार असून रक्तदान आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधले जाणार आहे. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन हे महायुती सरकार सत्तेवर आले आहे त्या सरकारचे लक्ष वेधण्यासाठी छत्रपतींच्या स्वराज्याची राजधानी किल्ले रायगड पायथ्याशी आंदोलन केले जाईल. आंदोलनाला येणाऱ्या सर्व दिव्यांगांनी २१, २२ व २३ मार्च असे तीन दिवस आपल्याला सहभाग घ्यायचा आहे याच तयारीने यायचे आहे. राज्यातील मराठवाड्यातील जिल्हा अध्यक्ष, जिल्हा संपर्कप्रमुख, तालुका अध्यक्ष, शहर अध्यक्ष व कार्यकारिणी सदस्य यांनी दिव्यांगांच्या अस्तित्वाच्या आंदोलनात सहभागी व्हावे. प्रत्येक जिल्ह्यातून मोठ्या संख्येने दिव्यांग या आंदोलनात सहभाग घेतील अशी जबाबदारी जिल्हाध्यक्षांकडे देण्यात आलेली आहे. तरी सर्व जिल्हाध्यक्ष यांनी आदरणीय बच्चू, भाऊ यांच्या आदेशाचे पालन करून त्यांच्या सूचनांचे पालन करावे अश्या सूचना प्रहारचे मराठवाडा अध्यक्ष मयुर काकडे यांनी मराठवाड्यातील सर्व पदधिकारी यांना दिल्या आहेत
तसेच धाराशिव जिल्ह्यातील जबाबदारी
बाळासाहेब कसबे,महादेव खंडाळकर,बाळासाहेब पाटील,महादेव चोपदार,महेश माळी,इसाक शेख,जमीर शेख, अभिजित साळुंके,दिनेश पोतदार, नवनाथ कचार,गणेश शिंदे, मारुती वाघमारे,,नयन नराटा, चित्रा शिंदे,हेमंत उंदरे,अमोल शेळके,बाबासाहेब भोईटे,मारोती पाटील,रामेश्वर मदने,आप्पा उपरे आदी पदधिकारी यांना देण्यात आलेली आहे ज्या दिव्यांग व्यक्तींना या आंदोलनात सहभागी होयच आहे त्यांनी या सर्व पदधिकारी यांना संपर्क साधावा असे आवाहन मयुर काकडे यांनी केले आहे
0 टिप्पण्या