धाराशिव प्रहारचे मशाल आंदोलन: शेतकरी कर्जमाफी आणि दिव्यांग मानधनासाठी जोरदार आंदोलन
धाराशिव –प्रतिनिधी...शहाजी आगळे
राज्याचे माजी मंत्री तथा प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष मा. बच्चूभाऊ कडू यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर शेतकरी व दिव्यांगांच्या न्याय मागण्यासाठी 'मशाल आंदोलन' पुकारण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर धाराशिव जिल्ह्यात प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने लोहारा उमरगाचे आमदार प्रविण स्वामी यांच्या निवासस्थानासमोर मशाल पेटवून ़ंआंदोलन करण्यात आले.
या आंदोलनाच्या निमित्ताने क्रांतीसूर्य महात्मा ज्योतीबा फुले यांची ११ एप्रिल रोजी होणारी जयंती विशेष साजरी करत, कार्यकर्त्यांनी गळ्यात निळा दुपट्टा आणि हातात भगवा ध्वज व पेटती मशाल घेऊन सरकारविरोधात संताप व्यक्त केला. शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी तातडीने कर्जमाफी देण्यात यावी, तसेच दिव्यांगांना दरमहा ६००० रुपये मानधन देण्याची मागणी आंदोलनात करण्यात आली.
या आंदोलनाच्य प्रमुख मागण्या पुढील प्रमाणे आहेत
1. सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी तत्काळ करावी.
2. पेरणीपासून कापणीपर्यंतचा खर्च MREGS अंतर्गत द्यावा.
3. दिव्यांग बांधवांना ६००० रुपये मासिक मानधन मंजूर करावे.
यांना प्रहारचे माजी जिल्हाध्यक्ष केदार सौदागर यांच्यासह सर्व पदाधिकारी यांनी निवेदन देत या मागण्यांसाठी पाठपुरावा करण्याची विनंती केली. "ही मशाल विधानसभेपर्यंत न्याय मिळवण्यासाठी उजेड घेऊन जाईल," असा निर्धार कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.
या आंदोलनाला प्रहारचे माजी जिल्हाध्यक्ष केदार सौदागर जिल्हा उपाध्यक्ष दयानंद राठोड लोहारा तालुका प्रमुख धामण ढोणे उमरगा तालुका प्रमुख अजीम खजुरे आदींसह प्रहार सैनिक व शेकडो शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 टिप्पण्या