फुले शाहू आंबेडकर उद्यान कृती समितीच्या वतीने आरोग्य शिबीर संपन्न..
प्रतिनिधी...शहाजी आगळे
धाराशिव फुले शाहू आंबेडकर उद्यान कृती समितीच्या वतीने महामानवांचा जयंती महोत्सव चालू असून या महोत्सवात अनेक सामाजिक उपक्रम राबविले जात आहेत,आज रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य शिबीर घेण्यात आले या आरोग्य शिबिरामध्ये नेत्र बीपी व शुगर तपासणी करण्यात आली,तत्पूर्वी महामानव विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस वैद्यकीय अधीक्षक डॉ.तानाजी लाकाळ व सह्याद्री शिशुग्रह प्रकल्पाचे डॉ.दिग्गज दापके यांच्या हस्ते पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले, आलेल्या मान्यवरांचा समितीच्या वतीने शाल व गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. दरवर्षीप्रमाणे यशराज पब्लिक स्कूल या शाळेतील विद्यार्थ्यांची सहल आकर्षक अशा देखाव्यास पाण्यासाठी आली, समितीच्या वतीने आलेल्या विद्यार्थ्ंना बिस्कीट पाण्याची व्यवस्था करण्यात आली.या कार्यक्रमास डॉ,तानाजी लाकाळ,डॉ.दिग्गज दापके,रुग्ण कल्याण समिती सदस्य अब्दुल लतिफ, जिल्हा क्रिडा अधिकारी श्रीकांत हरनाळे,सामाजिक कार्यकर्ते गफार भाई शेख,डॉ.लुंगे,गजानन पाटील अंजुमन वेल्फेअर सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष फिरोज भाई पल्ला आरोग्य मित्र रौफ शेख,सागर प्रधान,राजेंद्र पेठे,सचिन वाघमारे,समितीचे अध्यक्ष गणेश वाघमारे,अंकुश उबाळे,प्रविण जगताप, संजय गजधने,बलभीम कांबळे,संपतराव शिंदे,रमेश कांबळे,अतुल लष्करे,स्वराज जानराव,विशाल घरबुडवे,अमोल लष्करे,सुधाकर माळाळे,अमोल वाघमारे,तर शिबिरातील डॉ.निलेश कुरील,डॉ.महेश पाटील, डॉ.समीर,परिचारिका प्रियदर्शनी सरवदे,शुभांगी रणखांब अन्य इतर उपस्थित होते.सुत्रसंचलन बलभीम कांबळे यांनी केले,प्रस्तावना गणेश रानबा वाघमारे यांनी केले तर आभार शेख रौफ यांनी ना हमे धन चाहिए ना हमे दौलत चाहिए,बस हमे तो बाबासाहेब के संविधान का भारत वासियों को अधिकार चाहिए
शायरीतुन आभार मानले.
0 टिप्पण्या