Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

जयप्रकाश विद्यालयातील विशाखा कोळी यांची पोस्टात पोस्ट मास्तर पदी निवड


 प्रतिनिधी....मनोज जाधव 


      रुईभर : -दि  २६ मे रोजी जयप्रकाश माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, रुईभर येथे विशाखा अभिमान कोळी यांची पोस्ट ऑफीस धाराशिव येथे  असिस्टंट ब्रँच पोस्ट मास्टर (ABPM) पदी निवड झाली आहे. या निवडीबद्दल प्राचार्य जयप्रकाश कोळगे  यांच्या हस्ते विशाखा कोळी व त्याचे वडील अभिमान कोळी यांचा बुके देऊन सत्कार करण्यात आला. जयप्रकाश माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाची  ती माजी विद्यार्थीनी आहे. तिने आपल्या अथक प्रयत्नातून हे यश संपादन केले आहे. आपल्या आई-वडिलांच्या श्रमाचे फलित तिने करून दाखवले आहे. या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.

       याप्रसंगी डॉ आंबेडकर बाल विकास शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शिक्षण महर्षी श्री सुभाष दादा कोळगे , माजी जि प सदस्य श्री रामदास आण्णा कोळगे, माजी ग्राप सदस्य श्री राजनारायण कोळगे, प्रशासकिय अधिकारी श्रीमती शिवकन्या सांळुके, पर्यवेक्षक श्री काकासाहेब डोंगरे, तानाजी कोळगे , प्रा नानासाहेब पवार , गणेश जाधव , अथर्व क्षिरसागर , शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.

          कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रा प्रशांत कोळगे यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या