Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय व साहित्य भारती तर्फे योग दिवस साजरा..


    प्रतिनिधी ....मनोज जाधव 


   जागतिक योगा दिनानिमित्त जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय व अखिल भारतीय साहित्य परिषद पुरस्कृत साहित्य भारती धाराशिव यांच्या वतीने योगा दिवस साजरा करण्यात आला. यावेळी योग प्रशिक्षक युवराज नळे यांनी उपस्थितांना विविध प्रकारच्या योग प्रात्यक्षिकांद्वारे आरोग्य व तंदुरुस्तीबद्दल मार्गदर्शन केले. या योग शिबिराच्या आयोजनात जिल्हा ग्रंथालय अधिकारी हनुमान ढाकणे, विजयसिंह शिसोदे यांचेसह अखिल भारतीय साहित्य परिषद पुरस्कृत साहित्य भारती चे कार्यवाह रविंद्र शिंदे, अभिजित पतंगे, प्रमोद बचाटे, मुकुंद पाटील, मोहन शेवाळे, सुरेश शेळके, सिद्धेश्वर बेलुरे, गणेश वाघमारे, प्रविण जगताप यांनी महत्वपूर्ण सहभाग घेतला. या योग शिबिरात मोठ्या संख्येने कर्मचारी व नागरिक सहभागी झाले होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या