Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

वाशी तहसील कार्यालयाने जपली माणुसकी....


          प्रतिनिधी ...मनोज जाधव 

वाशी...

 त्याचे झाले असे की वाशी तालुक्यातील गोजवाडा येथील लोंढे यांच्या कुटुंबातील एका युवकाचा अपघातात पाय मोडल्याने त्यांना धाराशिव येथील मेडिकल कॉलेजमध्ये ऑपरेशन साठी दाखल केले परंतु त्यांच्याकडे योजनेमधून ऑपरेशन करण्यासाठी रेशन कार्ड नसल्याने अडचण येत होती ती अडचण धाराशिव कोर्टातील वकील मनीष वाघमारे यांनी रुग्णसेवक मनोज जाधव यांना सांगितली असता रुग्णसेवक मनोज जाधव यांनी वाशी तहसील कार्यालयातील त्यांचे मित्र संतोष सरगुले यांना सांगितली असता त्यांनी तत्काळ रेशन कार्ड पुरवठा विभागाच्या मदतीने उपलब्ध करुन दिले त्यामुळे त्या पेशंटचे ऑपरेशन योजनेतून मोफत झाले आणि रुग्णसेवक मनोज जाधव यांच्या हातून पुन्हा एकदा नकळत रुग्ण सेवा घडली आणि या चांगल्या कामासाठी ज्या देव माणसांनी मदत केली ते वाशी तहसील कार्यालयातील पुरवठा विभागाच्या नायब तहसीलदार श्रीमती विद्या राठोड त्यांचा सहकारी देशपांडे मॅडम सप्लाय इन्स्पेक्टर तसेच प्रशांत शिंगाडे व वैभव रणदिवे आणि रुग्णेसवक मनोज जाधव यांचे मित्र संतोष सरगुले साहेब व त्यांचे सर्व सहकारी या सर्व देव माणसांचे रुग्णसेवक मनोज जाधव यांनी कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याचे आभार व्यक्त केले

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या