प्रतिनिधी...मनोज जाधव
रुईभर :-दि 07 ऑक्टोंबर 2025 श्री स्वामी समर्थ कला व विज्ञान वरिष्ठ महाविद्यालय रुईभर येथील मुलीच्या संघाची राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
या स्पर्धा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर विद्यापीठातर्फे आंतर महाविद्यालयीन बॅडमिंटन स्पर्धा शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालय, कंळब येथे घेण्यात आल्या. श्री स्वामी समर्थ कला व विज्ञान वरिष्ठ महाविद्यालय, रुईभर येथील मुली विधाते अनुष्का शिवाजी व ढवळे पायल दत्ता यांच्या संघाने या स्पर्धेत छत्रपती संभाजीनगरच्या जवाहरलाल नेहरू महाविद्यालयाच्या मुलीच्या संघाचा पराभव करून प्रथम क्रमांक मिळवला. सदर संघाची राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेसाठी निवड झाली.
स्पर्धेतील विजेत्या संघाचे डॉ आंबेडकर बाल विकास शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शिक्षण महर्षी सुभाष दादा कोळगे, जि प सदस्य रामदास अण्णा कोळगे, ग्राप सदस्य राजनारायण कोळगे, प्राचार्य जयप्रकाश कोळगे, प्रशासकीय अधिकारी श्रीमती शिवकन्या साळुंके, श्री स्वामी समर्थ कला व विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य संतोष कपाळे, इंदिरा गांधी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक नानासाहेब शेलार, पर्यवेक्षक काकासाहेब डोंगरे यांनी अभिनंदन केले. पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.



0 टिप्पण्या