Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

आदर्शतेचा व दातृत्वाचा संगम म्हणजे डॉ.प्रवीण बनकर सर,एक शिक्षकाचा पुरस्कार झाला सर्व समाजाचा गौरव! धाराशिवचा अभिमान! शिक्षक डॉ. प्रवीण बनकर यांचा समाजाभिमुख उपक्रम


 आदर्शतेचा व दातृत्वाचा संगम म्हणजे डॉ.प्रवीण बनकर सर,एक शिक्षकाचा पुरस्कार झाला सर्व समाजाचा गौरव!


धाराशिवचा अभिमान! शिक्षक डॉ. प्रवीण बनकर यांचा समाजाभिमुख उपक्रम 


    प्रतिनिधी...मनोज जाधव  9823751412


धाराशिव, ता. ६ ऑक्टोबर —


क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक गुणगौरव पुरस्कार प्राप्त डॉ. श्री प्रवीण निलावती किसनराव बनकर यांनी आपल्या पुरस्कारातील ₹१,१०,०००/- इतकी संपूर्ण रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधी, महाराष्ट्र राज्य यासाठी देणगी म्हणून सुपूर्द करून समाजासमोर एक प्रेरणादायी उदाहरण घालून दिले आहे.


डॉ. बनकर यांनी ही देणगी मा. कीर्ती किरण पुजार साहेब, जिल्हाधिकारी धाराशिव यांच्या हस्ते धनादेशाच्या रूपात सुपूर्द केली. त्यांच्या या दातृत्वपूर्ण कृतीचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.


या प्रसंगी जिल्हा परिषद धाराशिव चे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. श्री मैनाक घोष साहेब, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सा. प्र.) श्री तुकाराम भालके साहेब, प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. दयानंद जटनुरे, शिक्षणाधिकारी (प्रा.) श्री नागेश मापारी साहेब, शिक्षण विस्तार अधिकारी श्री जंगम साहेब, डाएट अधिव्याखाता डॉ. बिराप्पा शिंदे सर, श्री प्रदीप घुले सर, तसेच सहकारी मित्र श्री वसंत पाटील सर उपस्थित होते.


🎙️ शिक्षक म्हणजे केवळ ज्ञानदाता नव्हे, तर समाजातील संवेदनशील कर्तव्यदक्ष नागरिकही असतो, हे डॉ. बनकर यांनी आपल्या कृतीतून अधोरेखित केले आहे. त्यांच्या या सामाजिक बांधिलकीच्या कृतीने धाराशिव जिल्ह्याच्या शैक्षणिक क्षेत्रात एक नवीन आदर्श निर्माण झाला आहे.


🔸 "एक शिक्षकाचा पुरस्कार झाला सर्व समाजाचा गौरव!

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या