प्रतिनिधी...मनोज जाधव
लातूर : तामलवाडी येथे एमआयडीसीच्या प्रस्तावित औद्योगिक प्रकल्पासाठी शेतजमिनींचे अधिग्रहण करताना संबंधित शेतकऱ्यांना विश्वासात न घेतल्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. या संदर्भात गट नंबर १२८ मधील शेतजमिनीवरील प्रस्तावित अधिग्रहणाविरोधात शेतकऱ्यांनी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी, एमआयडीसी लातूर यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे आक्षेप नोंदवला आहे.
शेतकऱ्यांनी नमूद केल्याप्रमाणे, २७ जानेवारी २०२५ रोजी मोजणी अधिकाऱ्याने जमिनीची मोजणी करून त्यांना कोणतीही पूर्वसूचना दिली नव्हती. त्यामुळे ही प्रक्रिया एकतर्फी व अन्यायकारक असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रस्तावित औद्योगिक प्रकल्पासाठी एमआयडीसीने 'पास थ्रू' प्रकारे प्रस्ताव सादर केला असला, तरी त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा सामूहिक सामाजिक आधार नाही. त्यामुळे अधिग्रहणास विरोध दर्शवण्यात आला आहे.
स्थानिक शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, मोजणी व प्रस्ताव सादर केल्यापूर्वी त्यांना विश्वासात घ्यायला हवे होते. तसेच ०८/०७/२०२५ रोजी सकाळी ११:०० वाजता मौजे तामलवाडी ग्रामपंचायत समोर सामूहिक आत्मदहन करण्याचा इशारा या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
शेतकऱ्यांनी स्पष्ट केले आहे की, सामाजिक आधार आणि स्थानिक सहमतीशिवाय कोणतीही अधिग्रहण प्रक्रिया स्वीकारली जाणार नाही.
या निवेदनावर तामलवाडी गावातील अनेक शेतकऱ्यांचे स्वाक्षऱ्या आहेत.
0 टिप्पण्या