प्रतिनिधी....मनोज जाधव
धाराशिव जिल्ह्यातील रुईभर या छोट्याशा गावात शेतकरी कुटुंबात जन्मलेले तिरुपती काकडे हे नाव आज महाराष्ट्राच्या पोलीस सेवेत एक आदर्श, एक प्रेरणा आणि एक जबाबदार प्रशासनिक अधिकारी म्हणून ओळखले जाते. जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर संघर्ष करत, मेहनत व चिकाटीच्या जोरावर त्यांनी आपली कारकीर्द घडवली आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळवून पोलीस सेवेतील उज्वल वाटचाल सुरू केली.
लातूर जिल्ह्यात उपविभागीय पोलिस अधिकारी (SDPO) म्हणून सुरुवात करत त्यांनी आपल्या कार्यशैलीने नागरिकांच्या मनात विश्वास निर्माण केला. कायदा व सुव्यवस्था सांभाळताना त्यांनी संयम, कठोरता आणि जनतेशी संवाद यांचा उत्तम समन्वय साधला. त्यानंतर सोलापूर जिल्ह्यातील अकलूज उपविभागात त्यांनी उल्लेखनीय सेवा दिली. त्यांच्या कारकिर्दीत पोलिस प्रशासनाला नवीन दिशा मिळाली.
कोरोना काळात त्यांनी दाखवलेली धैर्यशील व संवेदनशील सेवा विशेषत्वाने उल्लेखनीय ठरली. संकटातही कर्तव्याची जाण आणि माणुसकी जपणारी वृत्ती यामुळे त्यांच्याकडे प्रशासनाने कौतुकाने पाहिले. त्याचे फलित म्हणजे कोल्हापूर येथे त्यांची अतिरिक्त पोलीस अधीक्षकपदी बढती आणि त्यानंतर नवी मुंबईसारख्या अतिसंवेदनशील व गुन्हेगारीने प्रभावित असलेल्या शहरात पोलीस उपायुक्त पदाची जबाबदारी.
नवी मुंबईत गेली दोन वर्षे त्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर गुन्हेगारीच्या आळा घालण्यात महत्त्वाचे योगदान दिले. गुन्हेगारीविरुद्ध कठोर धोरण, पोलिसिंगमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, नागरिकांशी संवाद आणि पारदर्शक प्रशासन या साऱ्यांचा प्रभाव त्यांच्या कार्यशैलीत दिसतो.
आज त्यांचा वाढदिवस आहे. वाढदिवस हा केवळ उत्सव नसतो, तर जीवनातील टप्पे मोजण्याचा आणि नव्या जबाबदाऱ्या स्विकारण्याचा क्षण असतो. तिरुपती काकडे यांचा हा दिवस त्यांच्या कर्तृत्वाची उजळणी आणि भावी काळातील प्रेरणादायी वाटचालीची नोंद घ्यायचा आहे.
तिरुपती काकडे यांना वाढदिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा..!
त्यांचे कार्य, निष्ठा व सेवा भाव भविष्यातही महाराष्ट्रासाठी दीपस्तंभ ठरत राहो..!

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 
 
 
 
 
0 टिप्पण्या