प्रतिनिधी....मनोज जाधव
धाराशिव :- धाराशिव जिल्ह्याच्या समाज कल्याण विभागाच्या सहायक आयुक्त पदी सचिन कवले आल्याबद्दल मतदार जनजागरण समितीच्या वतीने भारतीय संविधानाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त संविधान उद्देशिका, विश्लेषण प्रत व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे भाषण व त्यांचा जीवन घटना क्रम हे छोटेसे पुस्तक देऊन शुभेच्छा दिल्या व काही सुचनांचे निवेदन देण्यात आले.यात म्हण्टले की,समाज कल्याण विभागाच्या ज्या काही योजना आहेत त्या सर्व सामान्यांना मिळतील,आपल्या विभागातील विद्यार्थ्यासाठी जी अभ्यासिका आहे ती चालु करुन उपयोगात आणावी, तृतीय पंथीयांच्या स्मशानभुमीच्या जागेचा प्रश्न मार्गी लावुन शासनाच्या धोरणानुसार कार्यक्रम राबविण्यात यावेत.भारतीय संविधानाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त समितीच्या वतीने आम्ही संविधान जनजागृती करीत आहोत,नविन मतदारांसाठी जनजागरण कार्यक्रम घेऊन शहरातुन दि.२६ नोव्हेंबर रोजी भारतीय संविधान दिनानिमित्त भव्य अशी रॅली काढली जाते,अशा प्रकारचे लेखी निवेदन चर्चा करुन दिले,यावेळी समिती कार्याध्यक्ष गणेश वाघमारे,आरोग्य मित्र शेख रौफ ब्रदर,सहसचिव प्रदिप पांढरे,पत्रकार श्रीकांत गायकवाड, सदस्य अमोल लष्करे तसेच समाज कल्याण विभागातील युवराज चव्हाण, अतुल जगताप,आर काझी उपस्थित होते.


0 टिप्पण्या