Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

योग ही भारताने जगाला दिलेली देण आहे - प्राचार्य जयप्रकाश कोळगे

 

     प्रतिनिधी....मनोज जाधव 

        रुईभर :- दि 21 जुन रोजी - योग (प्राणायाम ) ही भारताने जगाला दिलेली देण आहे. योग दिनानिमित्त जगभरात भारताच्या प्राचीन ज्ञानाचा प्रचार व प्रसार होतो. आजच्या यांत्रिक व तणावग्रस्त जीवनात योग दिन आरोग्यासाठी प्राणायाम महत्त्व विशद करतो. प्राणायमामुळे मानसिक आणि शारीरिक आरोग्य टिकण्यास मदत होते. विविध देशातून धर्मातून आणि संस्कृतीतून आलेले लोक एकत्र  योगाभ्यास करतात. योग दिनामुळे लोकांमध्ये सामूहिक सहभाग व एकात्मतेची भावना वाढीस लागते.

       आंतरराष्ट्रीय योग दिन ही संकल्पना 27 सप्टेंबर 2014 मध्ये संयुक्त राष्ट्र सभेमध्ये भारताचे तात्कालीन पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांनी मांडली व त्याला 14 डिसेंबर 2014 साली मंजुरी मिळाली. 21 जून आंतरराष्ट्रीय योग दिन पहिल्यांदा 21 जून 2015 मध्ये नवी दिल्ली या ठिकाणी साजरा करण्यात आला. योगाचे अनेक फायदे आहेत योगामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते, तणाव कमी होतो, व्यक्तीचे पाचनशक्ति सुधारते, जीवनशैली सुधारणे आत्मविश्वास वाढून सकारात्मक दृष्टिकोन वाढीस लागतो. योगाचे मानव जीवनात अनेक फायदे आहेत म्हणून रोज प्राणायाम करणे महत्त्वाचे आहे प्रत्येकाने हे लक्षात ठेवले पाहिजे की जगात प्राणायामाचे महत्त्व समजून घेऊन ते नित्य नियमाने करणे आवश्यक आहे अशी अपेक्षा आंतरराष्ट्रीय योग  दिनानिमित्त जयप्रकाश माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, रुईभर येथे मार्गदर्शन करताना प्राचार्य जयप्रकाश कोळगे बोलत होते. याप्रसंगी विद्यालयातील सर्व कर्मचारी व विद्यार्थ्यांनी प्राणायाम केले.

       योग दिनानिमित्त कार्यक्रमास डॉ आंबेडकर बाल विकास शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शिक्षण महर्षी श्री सुभाष दादा कोळगे, निळकंठ पाटील, (भाजप तालुका अध्यक्ष धाराशिव ) ,अभिजीत मंडगे, सुशील ढोबळे (बूथ प्रमुख ) , माजी जि प सदस्य श्री रामदास अण्णा कोळगे, माझे ग्राप सदस्य श्री राजनारायण कोळगे, प्रशासकीय अधिकारी श्रीमती शिवकन्या साळुंके , श्री स्वामी समर्थ कला विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य संतोष कपाळे, इंदिरा गांधी प्राथमिक शाळेचे मुअ नानासाहेब शेलार, पर्यवेक्षक काकासाहेब डोंगरे, शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते,    

       कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत कोळगे तर आभार श्री गणेश शेटे यांनी मानले,

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या