Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

राजश्री शाहू महाराज सामाजिक न्यायाचे प्रणेते होते - प्राचार्य जयप्रकाश कोळगे


         प्रतिनिधी....मनोज जाधव 

      रुईभर :- दि 26 जून रोजी राजश्री शाहू महाराज सामाजिक न्यायाचे प्रणेते होते. राजश्री शाहू महाराज हे खरे लोकशाहीवादी आणि समाजसुधारक मानले  जातात. राजश्री शाहू महाराज सक्षम राज्यकर्ते होते. त्यांनी राज्यातील मागास जातीतील लोकांसाठी न्याय देण्याचे काम केले. जाती - पंथाचा विचार न करता सर्वांना प्राथमिक शिक्षण देणे हे त्यांनी प्राधान्याचे मानले. ब्रिटिश काळामध्ये सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी व बहुजन समाजाच्या सामाजिक उन्नतीसाठी प्रयत्न केले. सनातनी वर्गाला न जुमानता दलित (अस्पृश्य ) व मागासवर्गीय समाजाच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. महाराष्ट्राला तीन प्रमुख समाज सुधारकांचा वैचारिक वारसा लाभला असल्यामुळे या राज्यास "फुले - शाहू - आंबेडकरांचा महाराष्ट्र " असेही म्हणतात. त्यांच्या या कार्यामुळे राजश्री शाहू महाराज यांना न्यायाचे प्रणेते होते असे उद्गार प्राचार्य जयप्रकाश कोळगे यांनी जयप्रकाश माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, रुईभर येथे राजश्री शाहू महाराज यांची जयंती साजरी करताना बोलत होते.

        कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ आंबेडकर बाल विकास शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शिक्षण महर्षी श्री सुभाष दादा कोळगे यांच्या हस्ते राजश्री शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार व श्रीफळ अर्पण करण्यात आले.

     याप्रसंगी माजी जि प सदस्य श्री रामदास अण्णा कोळगे, माजी ग्राप सदस्य श्री राजनारायण कोळगे, प्रशासकीय अधिकारी श्रीमती शिवकन्या साळुंके , श्री स्वामी समर्थ कला विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य संतोष कपाळे, इंदिरा गांधी प्राथमिक शाळेचे मुअ नानासाहेब शेलार, पर्यवेक्षक काकासाहेब डोंगरे, शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते,    

       कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिजित घोळवे यांनी तर आभार श्री प्रशांत कोळगे यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या