Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

इंदिरा गांधी लिटल चॅम्प चिमुकले बनले वारकरी


     प्रतिनिधी....मनोज जाधव 

       रुईभर : - दि ५ जुलै रोजी इंदिरा गांधी लिटल चॅम्प रुईभर येथील छोट्या चिमुकल्यानी वारकरी वेशभूषेत दिंडीचे आयोजन केले होते. त्यांच्या उत्साहाने पूर्ण वातावरण भक्तीमय झाले होते. चिमुकल्यानी भारतीय संस्कृतीत महाराष्ट्राच्या अध्यात्मिकतेची ओळख करून देत सर्वांची मने जिंकली. अगदी लहान वयातच अध्यात्मिकतेची ओढ निर्माण होणे आवश्यक आहे . डॉ आंबेडकर बाल विकास शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री सुभाष दादा कोळगे व ह भ प शिवाजी बारगुळे गुरुजी यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीचे पूजन केले व विठ्ठल रुक्मिणीच्या व वारकऱ्यांच्या वेशभूषेत टाळ मृदंगाच्या गजरात आणि तुळशी वृंदावन डोक्यावर घेऊन गावात दिंडीची फेरी काढण्यात आली. यांचे अनोखे प्रदर्शन लोकांची मने जिंकत होती. हा सोळा पाहून लोक चिमुकल्यांचे कौतुक करत होते. चिमुकल्यांना वारकरी वेशभूषेत प्रवृत्त करण्यासाठी इंदिरा गांधी लिटल चॅम्पच्या मुख्याध्यापिका श्रीमती मनिषा किरदत मॅडम, तनुजा कोळगे, श्रीमती संगिता वडवले यांनी परिश्रम घेतले. 

       या चिमुकल्याचे कौतुक  माजी जि प सदस्य रामदास आण्णा कोळगे , माजी ग्राप सदस्य राजनारायण कोळगे,  प्राचार्य जयप्रकाश कोळगे,  प्रशासकीय अधिकारी श्रीमती शिवकन्या साळुंके, श्री स्वामी समर्थ कला व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य संतोष कपाळे,इंदिरा गांधी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री नानासाहेब शेलार, पर्यवेक्षक काकासाहेब डोंगरे यांनी कौतुक केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या