प्रतिनिधी...मनोज जाधव
विश्वप्राप्ती इंग्लिश मिडियम स्कूल, चिखली येथे चिमुकल्यांची दिंडी व ग्रामप्रदक्षिणा उत्साहात पार
चिखली (ता. धाराशिव) – गावातील विश्वप्राप्ती इंग्लिश मिडियम स्कूल येथे विद्यार्थ्यांच्या सहभागातून पारंपरिक वेशभूषेत रंगतदार दिंडी आणि ग्रामप्रदक्षिणा पार पडली. भगवान विठ्ठल-माऊलीच्या वेशात सजलेले चिमुकले भक्त समूहाने “पांडुरंग... पांडुरंग” च्या जयघोषात संपूर्ण गावात भजन आणि कीर्तनाचा आनंददायी माहोल निर्माण केला.
या प्रसंगी मुलांनी संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, रुक्मिणी, कृष्ण, राम अशा विविध वेशभूषा परिधान करत भक्तीमय वातावरण निर्माण केले. पालक, शिक्षक व ग्रामस्थ यांच्यात उत्साहाचे वातावरण दिसून आले. या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आपली सांस्कृतिक परंपरा, वारकरी संप्रदायाची ओळख तसेच सामूहिकतेचे मूल्य शिकवण्यात आले.
शाळेच्या मुख्याध्यापक, शिक्षकवृंद व पालक वर्गाने या उपक्रमाचे आयोजन उत्तम प्रकारे केले होते. गावातील ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत त्यांना आशीर्वाद दिले.
हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी प्रेरणादायी ठरल्याचे मत पालकांनी व्यक्त केले.
0 टिप्पण्या