Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

काका शेलार यांची भाजप धाराशिव तालुका सरचिटणीस पदी निवड


     प्रतिनिधी....मनोज जाधव 


धाराशिव (प्रतिनिधी) : भारतीय जनता पक्ष धाराशिव तालुक्याच्या संघटनात्मक बांधणीसाठी महत्त्वपूर्ण नियुक्त्या सुरू असून त्याअंतर्गत काका शेलार यांची भाजप धाराशिव तालुका सरचिटणीस पदी नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाने त्यांच्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल परिसरात अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


काका शेलार हे गेल्या अनेक वर्षांपासून भाजपच्या कार्यामध्ये सक्रिय असून पक्षवाढीसाठी त्यांनी सातत्याने मेहनत घेतली आहे. सामाजिक कामातही त्यांचा सक्रीय सहभाग असून कार्यकर्त्यांमध्ये ते नेहमीच लोकप्रिय आहेत. सरचिटणीस पदाची जबाबदारी मिळाल्याने त्यांच्या खांद्यावर पक्ष संघटन वाढीची मोठी जबाबदारी आली आहे.


या निवडीबद्दल विविध स्तरांतील पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी आणि चाहत्यांनी त्यांचे अभिनंदन केले असून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.


               

पक्ष संघटनेच्या दृष्टीने ही निवड परिणामकारक ठरेल, असा विश्वास तालुक्यातील कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या