प्रतिनिधी...मनोज जाधव
खेर्डा (ता. कळंब, जि. धाराशिव) :
उद्धवराव पाटील ग्रामीण वाचनालय, खेर्डा येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी ग्रामस्थ आणि वाचनप्रेमींनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला.
कार्यक्रमाची सुरुवात गावातील ज्येष्ठ नागरिक रतन बाबुराव तांबारे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून व अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.
या कार्यक्रमास सरपंच बाबासाहेब जाधव, उपसरपंच अभिमान लिके, माजी सरपंच विक्रम भंडारे, ग्रंथालयाचे सचिव तानाजी लिके, अमोल भंडारे, भैया लिके, सूर्यकांत लिके, अन्सार बेग, सुधाकर जाधव, दीपक बनसोडे तसेच गावातील अनेक वाचक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमात अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याचा व संघर्षमय जीवनाचा आढावा घेण्यात आला. त्यांची सामाजिक समतेसाठीची प्रेरणादायक भूमिका, साहित्य निर्मिती आणि शाहिरी याबाबतही विवेचन झाले. यानिमित्ताने ग्रामीण भागात वाचनसंस्कृतीला चालना मिळावी, हा कार्यक्रमाचा उद्देश यशस्वी ठरला.
कार्यक्रमाचे आयोजन वाचनालयाच्या वतीने करण्यात आले होते. शेवटी उपस्थित मान्यवरांचे आभार मानण्यात आले.
0 टिप्पण्या