*फुले शाहू आंबेडकर उद्यान कृती समितीच्या वतीने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..*
धाराशिव :- थोर साहित्यिक, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०५ व्या जयंतीनिमित्त फुले शाहू आंबेडकर सेवा भावी संस्था धाराशिव संचलित फुले शाहू आंबेडकर उद्यान कृती समितीच्या वतीने अभिवादन करण्यात आले,विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार व लोकशाहिर अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन फुले शाहू आंबेडकर उद्यान कृती समितीच्या नियोजित जागेतील तथागत गौतम बुद्ध यांच्या मुर्तीस पुष्प अर्पण करुन सामुदायिक बुद्ध वंदना घेऊन अभिवादन करण्यात आले.यावेळी समितीचे अध्यक्ष गणेश वाघमारे,सचिव प्रविण जगताप,उपाध्यक्ष संजय गजधने, कोषाध्यक्ष अंकुश उबाळे,मार्गदर्शक सदस्य बाबासाहेब बनसोडे,मार्गदर्शक सदस्य धनंजय वाघमारे,स्वराज जानराव,सोमनाथ गायकवाड,उमाजी गायकवाड,अतुल लष्करे,राजाभाऊ बनसोडे,बाबा कांबळे,नेताजी पवार सह इतर उपस्थित होते.हा कार्यक्रम फुले शाहू आंबेडकर उद्यान कृती समितीच्या नियोजित जागेतील तथागत गौतम बुद्ध यांच्या मुर्ती समोर संपन्न झाला.
0 टिप्पण्या