Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

जयप्रकाश विद्यालयात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक स्मृति दिन साजरा


जयप्रकाश   विद्यालयात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक स्मृति दिन साजरा

        रुईभर- १ ऑगस्ट जयप्रकाश माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, रुईभर येथे लोकमान्य टिळक पुण्यतिथी ( स्मृतिदिन ) व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती कार्यक्रम प्राचार्य जयप्रकाश कोळगे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. प्रमुख अतिथी म्हणून श्री स्वामी समर्थ कला व विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य संतोष कपाळे उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते लोकशाहीर आण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून श्रीफळ अर्पण करण्यात आले.      

      कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य जयप्रकाश कोळगे यांनी लोकमान्य टिळक व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे कार्य स्पष्ट करताना म्हणाले की लोकमान्य टिळक यांनी भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या चळवळीत अग्रगण्य कार्य केले. त्यांनी आपले आयुष्य देशासाठी अर्पण केले मराठा, केसरी सारख्या वर्तमानपत्रातून समाज जागृतीचे कार्य केले. समाज जागृती होऊन उन्नती झाली पाहिजे असे मत होते. समाजात संघटितपणा वाढला पाहिजे अशी अपेक्षा ठेवत स्वातंत्र्य लढ्याला गती आणण्यासाठी संघटित होणे तेवढेच महत्त्वाचे होते म्हणून गणेशोत्सव शिवजयंती सारखे उत्सव सुरू केले. त्यांचे विचार अंगीकारणे गरजेचे आहे.     

        लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे कार्य व्यक्त होताना म्हणाले की येणाऱ्या अडचणीतून मार्ग काढत समाज उन्नतीचे कार्य केले. त्यांनी कादंबरी, नाटक  यासारखे साहित्य निर्माण केले. गायक, लोक कलावंत, प्रतिभावंत लेखक, थोर समाज प्रबोधनकार, जेष्ठ साहित्यिक म्हणून ओळख निर्माण केली . कोणत्याही व्यक्तीची इच्छाशक्ती तीव्र असेल तर कोणतेही कार्य सहज पार होते हे यांच्या कार्यातून दिसून येते. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांनी ही अडचणीवर मात करून देशोन्नतीचे कार्य करण्याची अपेक्षा याप्रसंगी त्यांनी व्यक्त केली.

        विद्यालयाचे पर्यवेक्षक  काकासाहेब डोंगरे यांनी लोकमान्य टिळक यांचा जीवन पट मार्मिक भाषेत मांडला. लोकमान्य टिळक लहानपणापासूनच प्रतिभाशाली होते. त्यांना जहाल विचाराचे म्हणून ओळखले जात. इंग्रजाच्या जुल्माला वाचा फोडण्यासाठी शैक्षणिक तसेच वृत्तपत्राद्वारे जनजागृती केली. लोकांना संघटित करून त्यांच्यात विचारविनिमय झाला पाहिजे . समाजातील लोकात राष्ट्रीय ऐक्य , स्वातंत्र्या विषयी जनजागृती घडवी म्हणून गणेश उत्सव, शिवजयंती सारखे कार्यक्रम सुरू केले. इंग्रजांच्या धोरणावर कडाडून टीका करणाऱ्या मध्ये हे एक होते. इंग्रजांच्या या धोरणाला विरोध करताना तुरुंगवासही भोगला . त्यांच्यातील हे देश प्रेम आत्मसात करावे अशी अपेक्षा याप्रसंगी व्यक्त केली .     

         प्राध्यापक चिंटू आगळे यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनकार्याचा आढावा देताना म्हणाले की मानवी जीवनातील संघर्ष, नाट्य, दुःख , दारिद्र्य त्यांच्या विविध साहित्यातून प्रकट होतो. अण्णाभाऊ साठे फक्त जीवनात दीड दिवस शाळेत गेले . पण त्यांची लेखणी धारदार होती . त्यांनी नाटक, पोवाडा , कथा, कादंबरी , प्रवास वर्णन हे साहित्य प्रभावीपणे लिहिले. साहित्यच नाहीतर लोकचळवळी व उपेक्षित कामगार वर्गासाठी मोर्चे काढले .आज त्यांच्या नावाने विविध योजना पाहावयास मिळतात. जीवन संघर्षमय  असेल तरच आपण काहीतरी करू शकतो. त्याचे जिवंत उदाहरण लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या कार्यातून आपल्याला पाहता येते. धाडसाने संघर्ष करायला शिका येणारा काळ आपलाच असेल. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात त्यांनी मौलाची कामगिरी केली आहे. त्यांच्या या संघर्षमय जीवनातून समाजासमोर त्यांनी आदर्श मांडला. आपणही संघर्षमय जीवन जगून समाजहिताचे कार्य करण्याची अपेक्षा व्यक्त केली.     

        याप्रसंगी डॉ आंबेडकर बालविकास शिक्षण संस्थचे अध्यक्ष शिक्षण महर्षी श्री सुभाष दादा कोळगे, माजी जि प सदस्य रामदास आण्णा कोळगे, माजी ग्रा प सदस्य राजनारायण कोळगे, प्रशासकीय अधिकारी शिवकन्या साळुंके ,  इंदिरा गांधी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक नानासाहेब शेलार, शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते.   

     कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक गणेश शेटे तर आभार  प्राध्यापक प्रशांत कोळगे यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या