*मेडसिंगा जिल्हा परिषद शाळेचे एलिमेंट्री परीक्षेत घवघवीत यश.*
मुख्य संपादक...मनोज जाधव 9823751412
धाराशिव तालुक्यातील मेडशिंगा येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना पवित्र असे ज्ञानदानाचे कार्य करत असताना त्यांच्या विविध कलागुणांना वाव देण्यासाठी शाळेतील सर्वच शिक्षक अहोरात्र परिश्रम घेत असतात आणि शाळेला एका चांगल्या उंचीवर घेऊन जाण्याचे काम शिक्षक करत असतात आत्तापर्यंत वेगवेगळ्या परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले आहे...
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मेडसिंगा येथे मुख्याध्यापक श्री . विजयकुमार पवार यांच्या प्रेरणेने एलिमेंट्री परीक्षेसाठी सहा विद्यार्थी बसले. त्यांना श्रीमती नयना देवकते व श्रीमती दिपाली जाधव यांनी मार्गदर्शन केले. परीक्षेचा निकाल शंभर टक्के लागला त्याबद्दल विस्ताराधिकारी श्रीमती शिंदे मॅडम व केंद्रप्रमुख दुधंबे साहेब यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. तसेच गावचे सरपंच श्री अनुरथ दुधभाते , ग्रामपंचायत चे सर्व सदस्य व शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष श्रीकृष्णा लाकाळ व सर्व सदस्य यांनी पालकांचे विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे कौतुक केले.
0 टिप्पण्या