श्री.स्वामी समर्थ कला व विज्ञान वरिष्ठ महाविद्यालय, रूईभर येथील माधुरी जगताप व मोहन चव्हाण यांची मुंबई पोलीस दलात निवड
मुख्य संपादक...मनोज जाधव 9853751412
रुईभर : -दि. 14 फेब्रुवारी 2025 डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर अंतर्गत श्री. स्वामी समर्थ कला व विज्ञान वरिष्ठ महाविद्यालय रूईभर ता. जि. धाराशिव महाविद्यालयाच्या दोन माजी विद्यार्थ्यांची मुंबई पोलीस दलात निवड झाल्याबद्दल डॉ. आंबेडकर बाल विकास शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री. सुभाष दादा कोळगे यांच्या हस्ते शॉल व बुके देऊन सत्कार करण्यात आला.
विठ्ठलवाडी या ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबातील माधुरी जगताप मुलीने सातत्यपूर्ण प्रयत्न करून मुंबई पोलीस पदावर यश मिळवले. महाविद्यालयातील सन 2022 मध्ये विज्ञान शाखेची पदवी जगताप यानी प्राप्त केली. सरकारी नोकरी आणि गाव असे समीकरण झालेले चिखली गावचे मोहन चव्हाण या शेतकरी कुटुंबातील मुलांने आपल्या गावाच्या यशाची परंपरा कायम ठेवत मुंबई पोलीस पदी यश मिळवले. मोहन चव्हाण महाविद्यालयाच्या कला शाखेचे विद्यार्थी आहेत. महाविद्यालयाच्या या माजी विद्यार्थ्यांचा सत्कार करून अभिनंदन केले. संस्थेचे अध्यक्ष श्री. सुभाष दादा कोळगे यांनी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी अशा यशस्वी विद्यार्थ्यांची प्रेरणा घेऊन आपल्या जीवनात यश मिळवावे असे मत व्यक्त केले.
या सत्कार समारंभास माजी जि प समस्य रामदासआण्णा कोळगे, माजी ग्रा प सदस्य रामनारायण कोळगे , प्राचार्य जयप्रकाश कोळगे , श्री स्वामी समर्थ कला व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य संतोष कपाळे, प्रा शिल्पाताई चौगुले , पर्यवेक्षक श्री डोंगरे के ए, प्राध्यापक, प्राध्यापिका, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
0 टिप्पण्या