शहर उपजिविका आराखडा समितीच्या अशासकीय सदस्य पदी नियुक्ती झाल्याबद्दल गणेश वाघमारे यांचा मतदार जनजागरण समितीच्या वतीने सत्कार..
प्रतिनिधी...शहाजी आगळे
धाराशिव :- गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय शहरी दारिद्र्य निर्मुलनासाठी नविन मिशन राबवित आहे याकरिता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातुन कार्य हाती घेतले असुन यासाठी शहर उपजिविका आराखडा कृती समिती स्थापन केली आहे,या समितीच्या अशासकीय सदस्य पदी सामाजिक कार्यकर्ते गणेश रानबा वाघमारे यांची नियुक्ती करण्यात आली याबद्दल मतदार जनजागरण समितीच्या वतीने गणेश वाघमारे यांचा शाही टोपी,पुष्पहार घालुन व पुष्प बुके आणि पेढे भरवुन सत्कार करण्यात आला आहे,हा कार्यक्रम विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या समोरील भारतीय संविधान उद्देशिकेच्या शिल्पासमोर घेण्यात आला.गणेश वाघमारे यांच्या निवडीचे कौतुक करतांना सचिव अब्दुल लतिफ यांनी मनोगत व्यक्त केले की,धाराशिव जिल्ह्यापासुन ते राज्य सरकार आणि दिल्ली पर्यंत त्यांचे कार्य कौतुकास्पद आहे यामुळेच त्यांना संधी मिळाली आहे,प्रा.अभिमान हंगरगेकर म्हणाले की,गणेश वाघमारे हे सातत्याने जनहितासाठी झटतात,सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करतात,यासोबतच,दलित मित्र शंकर खुने,राजेंद्र धावारे सह इतर मान्यवर यांनी मनोगतातुन शुभेच्छा दिल्या.यावेळी मतदार जनजागरण समितीचे सचिव अब्दुल लतिफ,प्रा.अभिमान हंगरगेकर,दलित मित्र शंकर खुने,राजेंद्र धावारे,मच्छिंद्र चव्हाण,सुधाकर माळाळे,पत्रकार समाधान मते,जनजागरण समितीचे उपाध्यक्ष सचिन चौधरी,सहसचिव संजय गजधने,कोषाध्यक्ष रौफ शेख,सदस्य युसुफ सय्यद,आविनाश मुंढे,रवि माळाळे,लहु कोळी,अनिल चंदनशिवे,सुनिल कांबळे,कैलास शिंदे,सुनिल माळाळे,अतुल लष्करे,समाधान सरवदे सह इतर उपस्थित होते.रौफ शेख यांनी रोते हुये को हसाते हो,भटके हुये को राह दिखाते हो,एक आप वह समाज सेवक हो,हर एक दिलों को सही रास्ता बताते हो..या शेर ने कार्यक्रमाची सांगता केली,सत्कार केल्याबद्दल गणेश वाघमारे यांनी आभार व्यक्त केले.
0 टिप्पण्या