Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

लोक आंदोलन न्यास धाराशिव यांच्या वतीने स्वागत आणि प्रशासनात पारदर्शकता आणण्यासाठी नूतन जिल्हाधिकारी यांना निवेदन...

*लोक आंदोलन न्यास धाराशिव यांच्या वतीने स्वागत आणि प्रशासनात पारदर्शकता आणण्यासाठी  नूतन जिल्हाधिकारी यांना निवेदन*

मुख्य संपादक...मनोज जाधव...9823751412

विषय : धाराशिव जिल्ह्यातील प्रशासनात पारदर्शकता आणून जनतेची कामे विहित वेळेत व्हावीत.

     आपण धाराशिव जिल्ह्याचा जिल्हाधिकारी म्हणून कार्यभार घेतल्याबद्दल हार्दिक अभिनंदन.
   वरील विषयी निवेदन असे कि, जिल्ह्यातील सर्व कार्यालयात खालील प्रमाणे शासकीय सूचनाचे पालन  प्रशासनात पारदर्शकता आणावी
1)प्रत्येक सार्वजनिक प्राधिकरण त्यांच्याकडून पुरीवण्यात येणाऱ्या लोकसेवाची सुचि दर्शनी भागात लावण्यास बंधनकारक करावे.
2) सर्व कार्यालयातील कर्मचारी व अधिकारी यांना कार्यालयात ओळख पत्र बंधनकारक करण्यात यावे.
3) ऑनलाईन आणि ऑफलाईन तक्रारी, निवेदन विहित वेळेत निकाली काढनेस बंधनकारक करावे.
4) माहिती अधिकारातील कलम 4 ख नुसार 1 ते 17 मुद्याची माहिती प्रदर्शित करून जनतेसाठी उपलब्ध करावी.
5) प्रत्येक सोमवारी माहिती अधिकार अधिनियम 2005 नागरिकांना अवलोकनासाठी अभिलेख उपलब्ध करून द्यावे.
6) सर्व कर्मचारी व अधिकारी यांना कामकाजच्या विहित वेळेत कार्यालयात हजर राहणेस आदेशीत करावे.
7) सर्व कार्यालयातील CCTV व बायोमॅट्रिक यंत्रणा कार्यान्वित करावी.
8 सार्वजनिक कामाची कार्यारंभ आदेश निघाला की ते काम चालू होण्यापूर्वी त्या कामाची माहिती दर्शवणारा बोर्ड त्या ठिकाणी लावावा.
        आपण कर्तव्यदक्ष अधिकारी आहात अशी आपली ओळख आहे. आणी आत्ताच आपण जिल्हाधिकारी म्हणून पदभार स्वीकारला असून आपण वरील कामे करून प्रशासनात पारदर्शकता आणाल अशी आमची अपेक्षा आणि विनंती करण्यात आली आहे.  निवेदनावर संघटनेचे कार्यकर्ते यांच्या स्वाक्षऱ्या                                मनोज खरे, संदीपान माळकर,
गालिबखान पठाण, परमेश्वर चिखलीकर, मनोज जाधव,आकाश बनसोडे,अतुल पुनगडे,विवेक यादव,दादा मूळे, लहू शिंदे,संकेत बनसोडे हे उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या