Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

देशाच्या प्रगतीत महिलांचा मौल्यवान वाटा - प्राचार्य जयप्रकाश कोळगे...

देशाच्या प्रगतीत महिलांचा मौल्यवान वाटा - प्राचार्य जयप्रकाश कोळगे ...

मुख्य संपादक...मनोज जाधव 9823751412

        रुईभर : - दि ८ मार्च रोजी पूर्वी स्त्रियांनी चूल आणि मूल एवढेच करावे असे म्हटले जायचे. मात्र आधुनिक काळात स्त्रियांच्या शिक्षणामुळे प्रत्येक क्षेत्रात शिक्षण घेऊन उत्तुंग भरारी घेतली आहे. कोणत्याही परीक्षेत मुलीच पुढे आहेत. त्यांनी कसल्याही प्रकारची भीती न बाळगता धाडसाने निर्णय घेतलेले पाहतोय. आज महिला समाजात कोणतेही काम सहजतेने हाताळताना दिसत आहेत. हे धाडस राष्ट्रमाता जिजाऊ, शिक्षणनाची जननी सावित्रीबाई फुले यांच्या कर्तृत्वातून स्त्रियांच्या पुढे आदर्श आहेत. क्रांतीसुर्य महात्मा फुले यांनी स्त्री शिक्षणाचे महत्त्व जाणले होते. शिक्षणाशिवाय समाजाची प्रगती होत नाही म्हणून प्रत्येक स्त्रीने शिक्षण घेतले पाहिजे. शिक्षणामुळे आपल्या कुटुंबाची व समाजाची प्रगती होते. आज प्रत्येक क्षेत्रात महिला कार्यरत दिसत आहेत. देशाच्या प्रगतीत महिलांचा मौल्यवान वाटा आहे असे प्रतिपादन जागतिक महिला दिनानिमित्त जयप्रकाश माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, रुईभर येथे प्राचार्य जयप्रकाश कोळगे बोलत होते.
        कार्यक्रमाचे अध्यक्ष शिक्षण महर्षी श्री सुभाष दादा कोळगे होते. राष्ट्रमाता जिजाऊ शिक्षणाची जननी सावित्रीबाई फुले व माजी पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्प व श्रीफळ अर्पण करण्यात आले.
      विद्यालयातील महिला कर्मचाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.   
         याप्रसंगी माजी जि प सदस्य रामदास आण्णा कोळगे. माजी ग्रा प सदस्य राजनारायण कोळगे, प्रशासकीय अधिकारी श्रीमती शिवकन्या साळुंके , इंदिरा गांधी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक नानासाहेब शेलार, शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.   
       कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार संस्कृतिक विभाग प्रमुख श्री अभिजीत घोळवे यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या