जिल्हाधिकारी कीर्ती किरण पूजार यांच्या हस्ते शासकीय योजनांचा मेळावा व आकर्षक देखाव्याचे उद्घाटन..
प्रतिनिधी...शहाजी आगळे
धाराशिव :- फुले शाहू आंबेडकर उद्यान कृती समितीच्या वतीने महामानवांच्या जयंती उत्सवातील आकर्षक अशा देखाव्याचे व शासकीय योजनेच्या मेळाव्याचे उद्घाटन जिल्हाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले.या शासकीय योजनेच्या मेळाव्यात 15 कार्यालयाचे स्टॉल लावण्यात आले होते,यामध्ये समाज कल्याण विभाग,तहसील कार्यालय, नगर परिषद,भूजल विभाग, बांधकाम कामगार विभाग,कृषी विभाग,म.फुले विकास महामंडळ,निवडणुक विभाग,जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामीण विभाग,आरोग्य विभाग,कृषी विभाग,व इतर कार्यालयाचा स्टॉल लावण्यात आला होता.प्रथमता विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर म. ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला जिल्हाधिकारी व मुख्याधिकारी यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.जिल्हाधिकारी कीर्ती किरण पूजार यांच्या हस्ते शासकीय योजनांचा मेळावा व आकर्षक देखाव्याचे उद्घाटन करण्यात आले.तथागत गौतम बुद्ध यांच्या मूर्तीस पुष्प अर्पण करून सामुदायिक बुद्ध वंदना घेण्यात आली.फुले शाहू आंबेडकर उद्यान कृती समितीच्या जागे संदर्भात व जागेतील नियोजना बाबतीत गणेश वाघमारे यांनी जिल्हाधिकारी यांना माहिती दिली.जिल्हाधिकारी यांनी स्टाॅल मधील योजनेबद्दल विचारणा केली, फुले शाहु आंबेडकर उद्यान कृती समितीच्या वतीने पाच दिवस चालणाऱ्या या जयंती महोत्सवात नागरिकांनी मोठ्या उत्साहाने सहभागी होऊन लाभ घ्यावा असे आवाहन ही जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी केले.उद्या दि.१२ एप्रिल रोजी आरोग्य शिबीर असुन याचा ही लाभ घ्यावा.यावेळी जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार,मुख्याधिकारी वसुधा फड,सिनेट सदस्य देविदास पाठक, नायाब तहसिलदार स्वामी साहेब तर समितीचे गणेश वाघमारे,प्रविण जगताप,अंकुश उबाळे, बौध्दाचार्य गुणवंत सोनवणे,धनंजय वाघमारे,संपतराव शिंदे, बलभीम कांबळे,डॉ.रमेश कांबळे,स्वराज जानराव,अतुल लष्करे,मुकेश मोटे,बाबासाहेब गुळीग,युसुफ सय्यद,शुभम मराठे,सुनिल शेरखाने,राजाभाऊ माळी,धनंजय राऊत,सिध्दार्थ बनसोडे,संजय गजधने सह इतर सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
0 टिप्पण्या