काश्मीर पहलगाम मधील पर्यटकांवरील हल्ल्याची सखोल चौकशी करुन पर्यटकांच्या सुरक्षेची जबाबदारी कायमस्वरुपी निश्चित करा..सद्भावना मंचचे प्रधानमंत्री यांना जिल्हाधिकारी यांच्या हस्ते निवेदन.
धाराशिव :- पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ सद्भावना मंचच्या वतीने प्रधानमंत्री यांना जिल्हाधिकारी यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले.यात म्हण्टले की,सर्व जाती धर्मामध्ये कायम एकतेची सद्भावना राहण्यासाठी आमचे प्रयत्न करणारे महाराष्ट्र राज्यातील धाराशिवचे सामाजिक संघटन आहे,पहलगाम मधील झालेल्या पर्यटकावरील हल्ल्याच्या आम्ही निषेध करतो.या हल्ल्यात निर्दोष २८ पर्यटकांचा जीव गेला याचे आम्हाला दुःख आहे.यात कोणत्याही प्रकारची सुरक्षा नसुन एकही पोलीस तिथे नव्हते.आपल्या बेपर्वा व बेजबाबदार सरकार मुळे हे झाले, तुम्ही कलम ३७० हटवून त्याचा आनंद व्यक्त केला हे कलम हटविल्याने काश्मीर सुरक्षित आहे व पर्यटकांना येथे येण्यासाठी आवाहन केले परंतु पहलगाम मधील हल्ल्याने परत एकदा सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला.काश्मिर मध्ये गेल्या दहा वर्षांत मोठमोठे अतिरेकी हल्ले झाले पुलवामा,उरी,आणि सध्याचा पुलवामा या सर्व घटनेची चौकशी सुप्रीम कोर्टातील सेवानिवृत्त न्यायाधीश यांच्या मार्गदर्शनाखाली करावी.पुलवामा व उरी या घटनेतील दोषी आणखी मिळाले नाहीत ही दुःखाची बाब आहे,काश्मीर मधील सुरक्षाव्यवस्था ही वारंवार तपासली पाहिजे,सिआरपिएफ,एसारपिएफ व स्थानिक पोलीस यंत्रणा येथील पर्यटन स्थळांवर कायम राबविली पाहिजे.अशा प्रकारचे लेखी निवेदन धाराशिव सद्भावना मंचच्या माध्यमातून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना जिल्हाधिकारी यांच्या हस्ते आरडिसी शोभा जाधव यांच्याशी चर्चा करुन देण्यात आले.यावेळी शाजुद्दीन शेख,धर्मवीर कदम,अब्दुल लतिफ,गणेश वाघमारे,सिकंदर पटेल,दादासाहेब जेटीथोर,विजय गायकवाड,श्री हाजगुडे,अन्य इतर उपस्थित होते.
0 टिप्पण्या