प्रतिनिधी...मनोज जाधव
स्पेलिंग बी स्पर्धेत मेडशिंगा शाळेची प्राची रोहिले प्रथम क्रमांकाने विजेती
तालुकास्तरीय स्पर्धेसाठी निवड; शाळेत सत्कार सोहळा संपन्न
रुईभर (ता. धाराशिव) – जिल्हा परिषद, धाराशिव यांच्या वतीने दिनांक ६ ऑगस्ट २०२५ रोजी बीट स्तरीय स्पेलिंग बी स्पर्धेचे आयोजन रुईभर येथे करण्यात आले होते. या स्पर्धेत एकूण ३२ शाळांनी सहभाग नोंदवून तीव्र स्पर्धा निर्माण केली होती.
या स्पर्धेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मेडशिंगा येथील इयत्ता सातवीतील विद्यार्थीनी प्राची नितीन रोहिले हिने उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला. तिच्या या यशामुळे तिची तालुकास्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.
प्राचीच्या या घवघवीत यशानंतर शाळेच्या वतीने तिचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी इयत्ता सातवीचे वर्गशिक्षक आणि विषय शिक्षक श्री. घोगरे सर यांचाही शाळेच्या वतीने गौरव करण्यात आला.
या यशामुळे शाळेचा व गावाचा गौरव वाढला असून प्राची आणि तिच्या शिक्षकांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
शाळेला नेहमी शिक्षण विस्तार अधिकारी शिंदे मॅडम,रुईभर केंद्राचे केंद्र प्रमुख दुधम्बे,तसेच शाळेचे मुख्याध्यापक पवार सर या सर्वांचे योग्य मार्गदर्शन लाभत असते असे या वेळी बोलताना घोगरे सरांनी सांगितले...
0 टिप्पण्या