प्रतिनिधी....मनोज जाधव
धाराशिव तालुक्यातील केशेगाव मंडळातील बारा गावांमध्ये भारतीय जनता पक्षाच्या वतीने संघटनात्मक दौऱ्याचे आयोजन करण्यात आले. आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या निर्देशानुसार व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष नेताजी पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा दौरा पार पडला.
या दौऱ्यात तोरंबा, ताकविकी, बामणी, केशेगाव, उंबरेगव्हाण, बरमगाव, वडाळा, पाटोदा, करजखेडा, गोगाव, काकास्पुर आणि नांदुर्गा या बारा गावांना भेट देण्यात आली. प्रत्येक गावात ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी, मागण्या आणि विकासाच्या अपेक्षा जाणून घेण्यात आल्या. गावात झालेल्या विकासकामांचा आढावा घेऊन येणाऱ्या काळात अधिकाधिक कामे करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
या बैठकीमध्ये माजी जि.प. अध्यक्ष नेताजी पाटील यांच्यासह भाजप केशेगाव गटप्रमुख अहमद पठाण, तालुका सरचिटणीस लिंबराज साळुंखे, तालुका चिटणीस त्रिंबक सूर्यवंशी, भाजप नेते बालाजी लोखंडे (करजखेडा), दिलीप सिंधफळे (तोरंबा), हनुमंत पाटील (नांदुर्गा), संजय पाटील भंडारी आदींनी सहभाग घेतला
.
दौऱ्याची सांगता नांदुर्गा येथे झाली. या ठिकाणी झालेल्या बैठकीत सरपंच गोपाल पाटील, पांडुरंग पाटील, वसंतराव मेंडके यांच्यासह ग्रामस्थ, महिला व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित ग्रामस्थांनी आपल्या समस्या मांडल्या, तर भाजप पदाधिकाऱ्यांनी त्या सोडवण्याचे आश्वासन दिले.
या दौऱ्यामुळे भाजपची ग्रामीण पातळीवरची पकड अधिक मजबूत झाल्याचे चित्र दिसून आले असून, ग्रामस्थांच्या प्रश्नांवर तत्काळ कार्यवाहीचे संकेत देण्यात आले आहेत.
0 टिप्पण्या