जिल्हा नियोजन समितीला कोणी केले वशीकरण?
जिल्हा नियोजन समिती दलालांचा अड्डा तर बनत नाही ना ?
कोणी केला जिल्हा वशीकरण ?
जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी निधी देणारी जिल्हा नियोजन समिती म्हणून याकडे संपूर्ण जिल्हा एक वेगळ्याच आशेने पाहतो परंतु धाराशिव जिल्ह्यातील जिल्हा नियोजन समिती ही सध्या वेगळ्याच गोष्टीने चर्चेत आहे..
धाराशिव जिल्ह्याच्या नियोजन समितीत सध्या टक्केवारीचे चक्रीवादळ उठले असून काही कंत्राटदारांनी जिल्ह्याचे पालकमंत्री यांचे तथाकथित पी ए म्हणून सांगणाऱ्या व्यक्तीला टक्केवारी दिली खरी परंतु तो पीए खरा की खोटा हे मात्र कायम गुलदस्त्यातच राहिले आणि गुत्तेदार टक्केवारी देऊन मोकळे झाले ?
नियोजन समितीला वशीकरण करणारा तो व्यक्ती कोण ?
परंतु धाराशिव जिल्ह्याच्या जिल्हा नियोजन समितीत जो निधी वाटप झाला त्यात धाराशिव जिल्ह्यातील आमदार खासदार व सध्याचे पालकमंत्री या सर्वांना साधी कल्पनाही नसताना त्या पीए ने मात्र टक्केवारी घेऊन कामाचे वाटपही केले त्यामुळे धाराशिव जिल्ह्यात सध्या एकच चर्चा आहे ती म्हणजे धाराशिव जिल्ह्यातील जिल्हा नियोजन समितीला नेमकं वशीकरण कोणी केलं ?
दिलेल्या टक्केवारीचे करायचं काय ?
जिल्हा नियोजन समितीला वशीकरण करणाऱ्या त्या पीएला टक्केवारी दिली खरी परंतु आता आपल्याला ते काम मिळेल का या चक्रावलेल्या अवस्थेत सर्व कंत्राटदार दिसून येत आहेत आणि वशीकरण करणाऱ्या त्या तथाकथित पीए च्या या गोंधळात जिल्हा मात्र पुन्हा एकदा विकासापासून दूर गेल्याचे दिसून येत आहे
0 टिप्पण्या