शिक्षण आणि कठोर परिश्रमाने जीवन घडते- माजी जि प सदस्य रामदास आण्णा कोळगे
रुईभर : - दि १ मे रोजी प्रत्येकानी आपल्या जीवनात आदर्श व्यक्तिमत्व घडवताना कर्तृत्वाने ज्या व्यक्ती मोठ्या झाल्या त्यांचे विचार घ्यावेत. शिक्षण घेऊन यशस्वी जीवनाची बाजी साता समुद्रा पार गेली पाहिजे. त्यासाठी शिक्षण आणि कठोर परिश्रम घेणारेच यशस्वी जीवन घडवत असतात असे प्रतिपादन महाराष्ट्र दिनानिमित्त जयप्रकाश माध्य व उच्च माध्यमिक विद्यालय, रुईभर येथे बोलत होते. ते पुढे म्हणाले की भाषावार राज्याच्या निर्मितीची कल्पना प्रत्येक राज्याचा सुरळीत राज्यकारभार चालावा या उद्देशाने निर्मिती केली. महाराष्ट्रात मुंबई हे आर्थिक केंद्र मानले जाते मात्र मुंबई हे गुजरात राज्यास जोडण्याचे प्रयत्न केले होते. तो प्रयत्न महाराष्ट्रातील जनतेने संघर्ष करून मुंबईला महाराष्ट्र राज्यास जोडले गेले. मात्र त्यासाठीही संघर्ष करावा लागला. महाराष्ट्र सुजलम् सुफलम् झाला पाहिजे. त्यासाठी सर्वांनी प्रत्येक क्षेत्रात प्रगती केली पाहिजे. महाराष्ट्र हे प्रगतिशील राज्य आहे. वृक्ष लागवडी सारखे अनेक महत्त्वपूर्ण कार्यक्रम महाराष्ट्रात राबले पाहिजे. त्यासाठी प्रत्येकानी एक तरी रोपटे प्रत्येक वर्षी लावले पाहिजे. त्याचे संगोपन केले पाहिजे. कामगार दिनानिमित्त ही सखोल माहिती सांगताना म्हणाले की कामगार हे कष्ट करतात त्यांचेही जीवन चांगले झाले पाहिजे. मात्र त्यासाठी ही संघर्ष करावा लागला. त्यातून प्रत्येक कामगारांनी आठ तास काम करण्याचे निश्चित झाले. कष्ट हे सर्वांनीच करून महाराष्ट्राबरोबर भारत देशाची उन्नती करावी अशी अपेक्षा याप्रसंगी व्यक्त केली.
विद्यालयाच्या प्रांगणात सकाळी ठीक ७.४० वाजता माजी सैनिक कोळगे दयानंद हनुमंत यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. विद्यालयामध्ये डॉ आंबेडकर बाल विकास शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शिक्षण महर्षी श्री सुभाष दादा कोळगे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम पार पडला. सन २०२४-२५ मध्ये इयत्ता पाचवी व आठवी शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच या वर्षातील इयत्ता पाचवी ते नववी व अकरावीचा वार्षिक निकाल जाहीर करताना प्रत्येक वर्गातील गुणानुक्रमे येणारे तीन विद्यार्थ्यांना प्रगती पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला.
प्राचार्य जयप्रकाश कोळगे यांनीही मार्गदर्शन केले. महाराष्ट्र दिन व कामगार दिना विषयी सखोल माहिती मार्मिक भाषेत सांगितली. प्रत्येक विद्यार्थ्यानी आपले जीवन यशस्वी करण्यासाठी स्पर्धा परीक्षा, शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करावी. आज शिष्यवृत्ती परीक्षेत यशस्वी झाले त्यांचे कौतुक केले. आज केलेल्या प्रयत्नातून शिष्यवृत्ती मिळाल्यामुळे कौतुक झाले. मात्र येणाऱ्या काळात आणखी प्रयत्न केले तर जीवन यशस्वी होईल. प्रत्येकाला यशस्वी जीवन घडवण्यासाठी अभ्यास हीच गुरुकिल्ली आहे असे मत व्यक्त केले.
याप्रसंगी माजी ग्रा प सदस्य श्री राजनारायण कोळगे, प्रशासकीय अधिकारी शिवकन्या साळुंके , प्राचार्य संतोष कपाळे, प्रा शिल्पाताई चौगुले, पर्यवेक्षक श्री काकासाहेब डोंगरे, शिक्षक वृंद , शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन कांबळे व अभिजीत घोळवे यांनी तर आभार श्री गणेश शेटे यांनी मानले.
0 टिप्पण्या