Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

मयुर काकडे राज्यस्तरीय बाळासाहेब ठाकरे ऑलराऊंडर पुरस्काराने सन्मानित

 मयुर काकडे राज्यस्तरीय बाळासाहेब ठाकरे ऑलराऊंडर पुरस्काराने सन्मानित

प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने संताजी-धनाजी कार्यकर्ता सन्मान २०२५ अंतर्गत राज्यातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांचा गौरव करण्यात आला. याच पार्श्वभूमीवर १२ मे २०२५ रोजी सोलापूर येथे झालेल्या विभागीय मेळाव्यात, प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष व माजी राज्यमंत्री मा. बच्चुभाऊ कडू यांच्या शुभहस्ते तथा उपक्रम प्रमुख महेश बडे,निरीक्षक मंगेश ठाकरे  यांच्या उपस्थितित राज्यस्तरीय बाळासाहेब ठाकरे ऑलराऊंडर पुरस्कार प्रदान करण्यात आला.

हा पुरस्कार मयुर काकडे यांना त्यांच्या सातत्यपूर्ण, सर्वसमावेशक व लोकहितासाठी केलेल्या कार्याबद्दल प्रदान करण्यात आला. आपल्या संघटनेच्या माध्यमातून समाजातील वंचित, उपेक्षित घटकांसाठी सातत्याने आवाज उठवणं, प्रशासनासमोर प्रश्न मांडणं आणि लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी कायम रस्त्यावर उतरून लढणं या कार्याची दखल घेऊन त्यांना हा सन्मान मिळाला आहे.

या पुरस्काराबाबत प्रतिक्रिया देताना मयुर काकडे यांनी सांगितले,

> "हा पुरस्कार माझ्या आई-वडिलांना, माझ्यावर निस्सीम प्रेम करणाऱ्या मित्रपरिवाराला, संघटनेतील माझ्यासोबत खंबीरपणे उभ्या असणाऱ्या प्रत्येक सहकाऱ्याला, आणि माझ्यावर सदैव कृपा असणाऱ्या शिवबाबाच्या आशीर्वादाला समर्पित करतो. मा. बच्चुभाऊंची प्रेरणा हीच आमच्यासारख्या कार्यकर्त्यांची खरी ताकद आहे."



हा सन्मान केवळ एक पुरस्कार नसून, समाजासाठी निस्वार्थीपणे कार्य करणाऱ्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांसाठी प्रेरणास्थान ठरणारा आहे.
पुरस्कार स्वीकारतेवेळी मयुर काकडे यांच्यासमवेत बाळासाहेब कसबे बाळासाहेब पाटील,महेश माळी, महादेव चोपदार, संजय शिंदे, रवी शित्रे, संजय नाईकवाडी, दिनेश पोतदार,नवनाथ कचार,अनिल महबोले तसेच संघटनेचे इतर पदाधिकारी देखील उपस्थित होते...

*मयुर काकडे यांच्या कार्याबद्दलची आजपर्यंतची काही माहिती👇*

निसर्गानं जन्मतःच अपंगत्व दिलं असलं तरी,आपल्या सदृढ मनाने त्या अपंगत्वावर मात करून सामाजिक कार्यात अग्रेसर असणारा आणि सदृढ लोकांनाही आपला आधार वाटणारा एक सच्चा सामाजिक कार्यकर्ता म्हणून  उस्मानाबाद जिल्ह्यात आपल्या  सामाजिक कार्याची एक वेगळी ओळख निर्माण करून , ज्याला अनेक सामाजिक पुरस्कार देऊन सन्मानित केला असा नवतरुण म्हणजे...
 मयूर ज्ञानेश्वर काकडे 
जन्म उस्मानाबाद जिल्ह्यातील वाघोली या छोट्याशा खेडेगावात  15/06/1985 रोजी झाला,वडील ज्ञानेश्वर काकडे वाहनचालक, आई गृहिणी.
मयूर काकडे यांनी आपले पदवी/पदवित्तर शिक्षण राज्यशास्त्र व समाजशास्त्र या विषयात पूर्ण केले.महाविद्यालयीन जीवनापासूनच सामाजिक कार्यात हिरीरीनी सहभाग घेणारा हा तरुण आपल्या अपंगत्वावर मात करून या तरुणाने समजला व विशेष करून आपल्या हजारो अपंग बांधवाना आधार देण्यासाठी 2010 पासून सामाजिक कार्यास वाहून घेतले.त्याचीच पावती म्हणून बऱ्याच ठिकाणी त्यांच्या मुलाखती विविध चॅनेल्स घेऊन मयूर काकडे याना आजपर्यंत विविध सामाजिक संस्थनी आपले पुरस्कार देऊन लौकिक केला आहे त्यापैकी पुरस्कार म्हणजे ....

1)महामहिम राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्कार 2022
2) सामाजिक न्याय विभागाच्या वतीने  सलग 5 ते 6 वर्ष सामाजिक कार्य व दिव्यांग क्षेत्रात कार्यकेल्याबाबद्दल दिव्यांगरत्न पुरस्कार.
3) महाराष्ट्र राज्य दिव्यांग कर्मचारी/अधिकारी संघटनेच्या वतीने दिव्यांग भुषण पुरस्कार,
4) निवडणूक विभाग उस्मानाबाद च्या वतीने दिव्यांग मतदार नोंदणी मध्ये उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल सलग दोन वर्षे 
5) अवेरनेस ग्रुप उस्मानाबाद च्या वतीने सामाजिक योगदान बद्दल अवेरनेस अवॉर्ड ,
6) सक्षम पोलीस टाइम्स च्या वतीने सक्षम दिव्यांग योद्धा पुरस्कार,
7) प्रहार समाज रत्न पुरस्कार,
8) शिवाश्रम प्रतिष्ठान शिर्डी च्या वतीने दिव्यांग क्षेत्रात काम केल्याबद्दल पुरस्कार,
9)महाराष्ट्र दिव्यांग संघटना व सुर्योदया संस्था महाराष्ट्र यांच्या वतीने दिव्यांग रत्न पुरस्कार 2021
10) प्रहार च्या वतीने उत्कृष्ठ प्रतिनिधी म्हणून राज्यात तिसरा प्रहार पुरस्कार.
11) वीर महाराष्ट्र योद्धा पुरस्कार
12)ज्ञानवर्धिनी फौंडेशन च्या वतीने युथ आयकॉन 2020
13) ज्ञान किरण बहुउद्देशीय संस्थेचा मराठवाड़ा युवा गौरव पुरस्कार 2023
 असे विविध पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.खऱ्या अर्थाने मयूर काकडे यांनी आपले अपंगत्व बाजूला सारून, त्यांनी हजारो लोकांना आपल्या सामाजिक कार्यातून मदत करून ,ते या समाजाचा एक कणाच ठरले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या