प्रतिनिधी.....मनोज जाधव
रुईभर :-दि १८ मे रोजी जयप्रकाश माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, रुईभर ता. जि. धाराशिव येथे माजी विद्यार्थ्यांचा ३९ वर्षांनी आठवणीचा हिंदोळा ( गेट-टुगेदर ) आनंदी वातावरणात संपन्न झाला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ आंबेडकर बाल विकास शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शिक्षण महर्षी श्री सुभाष दादा कोळगे होते. प्रमुख अतिथी सन १९८५-८६ च्या बॅचचे श्री नाईकवाडी जी एन, श्री पडवळ एस एल , श्री सातपुते व्ही पी, श्री भोईटे ए के, श्री बांगर जी डी, श्री भोजगुडे एस डी, श्री शिंदे बी बी, श्री सुतार जी एम, श्री राऊत आर जी , श्री पडवळ डी ए हे सर्व शिक्षक प्रामुख्याने उपस्थित होते.
विद्यालयात ३९ वर्षापूर्वी शिक्षण घेत असतानाचा अनुभव आणि आत्ताचा अनुभव हा प्रत्येकाच्या चेहऱ्यावर झळकत होता. वेगवेगळ्या पदावर कार्यरत असलेले सर्व मित्र एकत्रित येत भूतकाळातील बालपर्णाच्या आठवणीला उजाळा व नवीन विचारांची देवाण-घेवाण घेण्यामध्ये मग्न होते. ३९ वर्षांनी हे चमकते तारे एकत्र आल्याचा अनुभव हा प्रत्येकामध्ये जाणवत होता.
माजी विद्यार्थी सतीश पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले. ते सध्या उपअभियंता पदावर कार्यरत आहेत. विद्यालयातील आठवणी सांगताना संस्थेचे अध्यक्ष सुभाष दादा कोळगे यांच्या भाषणातून शिस्तीविषयी विशद केलेले विचार जीवन घडवण्यात अनमोल ठरलेले आहेत. आज ही परिसरात आपल्या विद्यालयाचा नावलौकिक आहे. अशा विद्यालयातून गुरुवर्यनी दिलेली शिक्षा जीवनाला दिशा देणारी ठरली. जीवनात प्रत्येक क्षणी या मार्गदर्शनाला विसरू शकत नाही. या विद्यालयात शिक्षण मिळाले हे माझे भाग्य समजतो असे मत व्यक्त केले.
गुरूच्या हस्ते आजही शिक्षाचा अनुभव घेत छडीचा मार घेतला.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रामुख्याने मा श्री मुस्तफा खोंदे (नायब तहसीलदार, औसा ) नवनाथ भोयटे, रावसाहेब सिरसाठे , राजेंद्र सरवदे व त्यांचे वर्गमित्र सर्वांनी परिश्रम घेतले. उत्साहाने कार्यक्रमास माजी विद्यार्थी उपस्थित होते.
याप्रसंगी माजी जि प सदस्य रामदास अण्णा कोळगे, माजी ग्राप सदस्य राजनारायण कोळगे, प्राचार्य जयप्रकाश कोळगे, इंदिरा गांधी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक नानासाहेब शेलार, पर्यवेक्षक श्री काकासाहेब डोंगरे, शिक्षक वृंद , शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
0 टिप्पण्या