Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

हॉटेल अलंकार येथे खा.ओमराजे निंबाळकर आणि आ.कैलास दादा घाडगे पाटील यांच्या उपस्थिती मध्ये महात्मा बसवेश्वर यांची जयंती साजरी


हॉटेल अलंकार येथे खा.ओमराजे निंबाळकर आणि आ.कैलास दादा घाडगे पाटील यांच्या उपस्थिती मध्ये महात्मा बसवेश्वर यांची जयंती साजरी 

प्रतिनिधी...मनोज जाधव 9823751412

धाराशिव शहरातील समतानगर येथील हॉटेल अलंकार येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही क्रांतीसुर्य जगत ज्योती महात्मा बसवेश्वर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळेस धाराशिव जिल्ह्याचे माननीय खासदार श्री ओमराजे निंबाळकर धाराशिव कळंब मतदारसंघाचे माननीय आमदार श्री कैलास घाडगे पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. महात्मा बसवेश्वरांच्या प्रतिमेचे  पूजन खासदार ओमराजे निंबाळकर व आमदार कैलास घाडगे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. हॉटेल अलंकार चे मालक व सामाजिक कार्यकर्ते श्री विठ्ठल आप्पा खरे यांनी महात्मा बसवेश्वर हे वीरशैव धर्माचे पुनरूज्जीवन करणारी महान विभूती होते. त्यांनी धर्म, समाज, तत्त्वज्ञान, वाङ्मय, राजकारण इ. क्षेत्रांत केलेले कार्य क्रांतिकारक स्वरूपाचे आहे. बसवेश्वर हे मध्ययुगातील भारताच्या धार्मिक, सांस्कृतिक, साहित्यिक, शैक्षणिक, राजकीय व सामाजिक जीवनातील ज्येष्ठ समाज परिवर्तनवादी युगपुरुष होते असे सांगितले. सदर कार्यक्रमास श्री युवराज बप्पा नळे,एडवोकेट श्री विशाल साखरे, श्री नाना घाटगे,श्री परमेश्वर वाले, श्री परमेश्वर राऊत, श्री राजाभाऊ माळी, श्री सतीश माळी, श्री गिरीश पाळणे, श्री सतीश कानडे, प्राध्यापक शिवरत्न खरे, श्री गुरुनाथ आवटे, श्री  माधव शिंदे, श्री महेश काटे,तसेच लिंगायत बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या