अनंत उत्तरेश्वर गायके यांचा सेवानिवृत्ती निमित्त करण्यात आला सत्कार..
प्रतिनिधी...मनोज जाधव 9823751412
कळंब कृषी उत्पन्न बाजार समितीचे निरीक्षक पदावरून सेवानिवृत्त झालेले अनंत उत्तरेश्वर गायके यांचा व्यापारी व यशवंत किसान विकास मंचाच्या वतीने शाल श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला.
श्री गायके यांनी दीर्घकाळ सेवा बजावताना बाजार समितीच्या कामकाजात पारदर्शकता आणि शेतकऱ्यांच्या हिताचे धोरण राबवण्यात मोलाचा वाटा उचलला त्यांच्या कार्याची दखल घेत मंचातर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक लक्ष्मण नाना कोल्हे यशवंत किसान विकास मंचाचे अमोल अण्णा शेळके ,व्यापारी आडते प्रमोद बलदोटा,लक्ष्मीकांत जोशी,बालाजी लाखे,हरिपाल रामिष्ट, राखुंडे बाप्पा,डिगंबर शिंदे,केशव शिंदे व श्याम मालपाणी हे उपस्थित होते.कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित मान्यवरांनी श्री अनंत गायके यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
0 टिप्पण्या