Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

फुले शाहु आंबेडकर उद्यान कृती समितीच्या आकर्षक अशा देखाव्यास पालकमंत्री प्रताप सरनाईक यांची भेट

फुले शाहु आंबेडकर उद्यान कृती समितीच्या आकर्षक अशा देखाव्यास पालकमंत्री प्रताप सरनाईक यांची भेट..

धाराशिव :- विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त फुले शाहु आंबेडकर उद्यान कृती समितीच्या वतीने महामानवाचा जयंती महोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो,या महोत्सवात शासकीय योजनांचा मेळावा, आरोग्य शिबीर,भोजनदान, रक्तदान, गुणवंतांचा सत्कार, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप असे सामाजिक उपक्रम राबविण्यात आले तर आकर्षक असा देखावा सादर केला आहे,हा देखावा दि.१२ मे रोजी बुध्द पौर्णिमा पर्यंत ठेवण्यात आला असुन पालकमंत्री प्रताप सरनाईक हे धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता त्यांनी फुले शाहु आंबेडकर उद्यान कृती समितीच्या महामानवाचा जयंती महोत्सवातील आकर्षक अशा देखाव्यास भेट दिली,प्रथमतः महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले,तसेच समितीच्या नियोजित जागेतील तथागत गौतम बुद्ध यांच्या मुर्तीस वंदन केले,समितीचे अध्यक्ष गणेश वाघमारे यांनी आकर्षक अशा देखाव्याची माहिती दिली, भारतीय संविधान अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त संविधान जनजागृती म्हणुन महिन्यातील दर 26 तारखेला विविध मान्यवरांच्या उपस्थितीत व्याख्यान व इतर कार्यक्रम घेण्यात येत आहेत हि देखील माहिती दिली,आकर्षक देखाव्याचे सविस्तर असे की,महाडच्या चवदार तळ्याचे पाणी सत्याग्रह,डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्म वेळ प्रसंगी झोपडी,दिक्षा भुमी, भारतीय संविधान अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त संविधान उद्देशिका प्रत,तथागत गौतम बुद्ध यांची सुंदर अशी भुमी स्पर्श मुर्ती,भारताचा नकाशा व कोहिनूर हिरा,शितल प्रकाश देणारा चंद्ररुपी तथागत बुद्ध,अशा देखाव्याचे सादरीकरण करण्यात आले आहे,हा देखावा पाहुन पालकमंत्री यांनी कौतुक केले.तसेच जिल्हा परिषदेच्या अधिनस्त व फुले शाहु आंबेडकर उद्यान कृती समितीच्या नियोजित जागेचे नगर परिषद यांच्या कडे हस्तांतरित बाबत सविस्तर माहिती पालकमंत्री यांना गणेश वाघमारे यांनी दिली,उपलब्ध असलेल्या निधीतुन सभागृहाचे बांधकाम करण्यास जिल्हाधिकारी व सिईओ यांना पालकमंत्र्यांनी सुचना देत याबाबत निधी कमी पडु देणार नाही असे आश्वासन ही दिले.समितीच्या वतीने अध्यक्ष गणेश वाघमारे यांनी पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचे भारतीय संविधान उद्देशिका व विश्लेषण पत्रक,सन्मान चिन्ह देऊन स्वागत केले,यासोबतच सुरज साळुंखे,सुधिर पाटील व इतर मान्यवरांचे ही स्वागत करण्यात आले, कामगार दिनानिमित्त देखावा तयार करणारे कलाकार शशी माने व कामगार यांचाही सत्कार पालकमंत्री यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार,सिईओ मैनाक घोष,
अमरराजे,डिएन कोळी,सिध्दार्थ बनसोडे,पुष्पकांत माळाळे,अमर माळी,संजय मुंढे,अभिजीत देडे,सह समिती अध्यक्ष गणेश वाघमारे,सचिव प्रवीण जगताप,उपाध्यक्ष संजय गजधने,कोषाध्यक्ष अंकुश उबाळे,मार्गदर्शक सदस्य बलभीम कांबळे,संपतराव शिंदे,बाबासाहेब गुळीग,डॉ रमेश कांबळे,बापु कुचेकर,श्रीकांत गायकवाड, अतुल लष्करे अन्य इतर उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या