Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

कृषी सखी” करणार राष्ट्रीय नैसर्गिक शेती मिशन योजनेतील तंत्रज्ञानाचा प्रचार प्रसार ... मिसाळ

कृषी सखी”  करणार राष्ट्रीय नैसर्गिक शेती मिशन योजनेतील तंत्रज्ञानाचा प्रचार प्रसार ...  मिसाळ

प्रतिनिधी ...मनोज जाधव 9823751412

नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी राष्ट्रीय नैसर्गिक शेती मिशनची राज्यात अंमलबजावणी सुरु आहे. नैसर्गिक शेती ही पशुधन आणि स्थानिक पातळीवरील उपलब्ध संसाधनावर आधारित आणि भारतीय परंपरेत रुजलेली रसायनमुक्त शेती पद्धती आहे. शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी करणे. बाह्य निविष्ठा खरेदी न करणे, निसर्गावर आधारित शाश्वत शेती प्रणाली विकसित करणे. मातीचे आरोग्य आणि सुपीकता पुनरुज्जीवित  करणे. पाण्याची गुणवत्ता वाढवणे जैवविविधता जतन करणे आणि शेतकरी, त्यांचे कुटुंब आणि ग्राहकांना सुरक्षित आरोग्यदायी आणि पौष्टिक अन्न पुरवणे हे मुख्य उद्दिष्ट नैसर्गिक शेती मिशनचे आहे.
      या प्रकल्पातील कृषी सखी यांचे पाच दिवसीय प्रशिक्षण स्थानिक नैसर्गिक शेती संस्था, धाराशिव शिवार सारथी जि. प. शेतकरी उत्पादक कंपनी लि. यांनी आयोजित केले आहे. सदरील कार्यक्रमास मा. मिसाळ सर, प्रकल्प संचालक,आत्मा धाराशिव यांनी मार्गदर्शन केले, कृषी सखी गाव स्तरावर काम करत शेतकरी निवडीमध्ये कृषी सहय्यकाच्या गाव स्तरावर या योजनेतील तंत्रज्ञानाचा प्रचार प्रसार करण्याचे काम करणार असल्याची माहिती दिली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या