तहसील कार्यालयातील कामचुकार अधिकाऱ्यांवर कार्यवाही करण्याची छावा संघटनेची निवेदनाद्वारे मागणी
उमरगा प्रतिनिधी: उमरगा तहसील कार्यालयातील कामचुकार कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली.सविस्तर वृत्त असे की, उमरगा तालुक्यातील ग्रामीण भागातील शेतकरी, कष्टकरी, निराधार, वेगवेगळ्या प्रकारचे अनेक कामे तहसील कार्यालयाशी संलग्न असल्याने अनेक वेळा हेलपाटे मारावे लागतात.परंतु उमरगा तहसील कार्यालयातील कामचुकार कर्मचारी लेटलतिफ आणि शासनाने घातलेल्या नियमांचे पालन करत नाहीत.उलट कार्यालयात येऊन काही कर्मचारी फक्त सही करून जातात.तर काल दि ७/५/२५ रोजी छावा संघटनेच्या वतीने स्पाॅटपंचना केला.यामध्येआस्थापना विभाग,लेखा विभाग -युवराज शिंदे,नायब तहसीलदार महसूल -भिमाशंकर बेरूळे, नायब तहसीलदार भारती, नैसर्गिक आपत्ती -कदम मॅडम, संजय गांधी योजना -ठाकूर मॅडम, निवडणूक विभाग, भुकंप पुनर्वसन -मुळे मॅडम, शिपाई गायकवाड बाई, पोतदार बाई, अनुपस्थित होते.हे वरील कर्मचारी शासनाने ठरवून दिलेल्या वेळापत्रकाची खिल्ली उडवत आहेत.ही बाब अखिल भारतीय छावा संघटनेचे युवक जिल्हाध्यक्ष बाळासाहेब माने तहसीलदार श्री येरमे यांच्या निदर्शनास आणून दिली. आज दि.८/५/२५ रोजी निवेदन देऊन स्थानिक कर्मचारी याचा दूरूपयोग करत आहेत.अशा कर्मचाऱ्यांना जवळचे २जिल्हे सोडून बदली करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी अखिल भारतीय छावा संघटनेचे युवक जिल्हाध्यक्ष बाळासाहेब माने, सामाजिक कार्यकर्ते युवराज गायकवाड आदींच्या निवेदनावर सह्या आहेत.चार दिवसांत कामचुकार कर्मचाऱ्यांवर कारवाई करा अन्यथा तिव्र आंदोलन छेडण्याचा इशारा अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आला आहे.
0 टिप्पण्या