प्रतिनिधी....मनोज जाधव
धाराशिव जिल्ह्यात प्रामुख्याने धाराशिव शहरातील खते व बी बियाणे विक्री करणाऱ्या दुकानात पेरणीपूर्वीच डीएपी खताचा तुटवडा जाणवत आहे कारण पूर्व मोसमी पाऊस झाल्याने शेतीच्या कामाला व मशागतीला वेग आला... त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीसाठी दुकानाकडे धाव घेतली परंतु त्यांना सर्वच दुकानातून डीएपी खताची मागणी केली असता खत शिल्लक नाही असे उत्तर दुकानदाराकडून मिळत आहे मात्र प्रत्यक्षात पेरणीला आणखीन सुरुवातही झाली नाही तरीही डीएपी खताचा तुटवडा कसा झाला हा शेतकऱ्यांसमोर मोठा प्रश्न उभा राहिला असून पेरणीपूर्वीच खत संपल्याने नेमका जिल्ह्याचा आलेला कोठा दुकानदारांनी कुठल्या कामासाठी वापरला हे मात्र दुकानदारांना सांगता येत नाही व शेतकऱ्यांना समजत नाही त्यामुळे शेतकऱ्यांची पेरणीसाठी खतामुळे अडवणूक होत असून त्यांना दुकानदाराकडून दुसऱ्याच कंपनीचे खत घेऊन जाण्यास सांगितले जात असून शेतकरी मात्र पूर्णपणे धास्तावला असून आपल्या जिल्ह्याला आलेला डीएपी खत शेतकऱ्यांना जर मिळत नसेल तर तो नेमका कोणाला मिळतो या पाठीमागे कोण आहे अशी शेतकऱ्यांकडून दबक्या आवाजात चर्चा ऐकायला मिळत असून सदरील प्रकरणी जिल्ह्यातील कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ लक्ष घालावे अन्यथा जिल्ह्यात आलेला डीएपी खत दुकानदार चढ्या भावाने कोणालातरी नक्कीच विक्री करणार व नफेखोरी करणार त्यामुळे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी जागरूकता दाखवत तात्काळ योग्य ती पावले उचलावीत व शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी शेतकरी वर्गातून दुकानाच्या समोर एकमेकात चर्चा होत असताना ऐकायला येत आहे
0 टिप्पण्या