प्रतिनिधी....मनोज जाधव
धाराशिव जिल्ह्यातील मौजे मेडसिंग आहे गाव बँक ऑफ महाराष्ट्र शाखा आनंद नगर यांच्याकडे दत्तक गाव म्हणून शासनाच्या वतीने वर्ग केले असून या बँकेकडून गावाला शासनाच्या वतीने ज्या काही योजना असतील त्या राबवत असताना नवीन उद्योगाला चालना देण्यासाठी व शेतीला चालना देण्यासाठी लागणाऱ्या रकमेसाठी बँक नेहमीच तत्पर राहून शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा करत आहे तसेच आज आनंदनगर शाखेच्या वतीने बँक आपल्या दारी या म्हणीला साजेसे काम करत असताना गावात जाऊन गावातील शेतकरी युवक उद्योजक व सुशिक्षित बेकारांना शासनाच्या विविध योजनेचे मार्गदर्शन करून त्यांना लाभ घेण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले यावेळी गावातील युवकांना व उद्योजकांना तसेच शेतकऱ्यांना बँक ऑफ महाराष्ट्र शाखा आनंद नगरचे शाखा अधिकारी राजेश खुशवाह, सीनियर मॅनेजर सुनील कुमार, तसेच नागेश देंडे व दत्ता घोडके हे कर्मचारी यावेळी मेडशिंगा गावात हजर होते सर्वांनीच चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केल्याने लोकांना बँकेबद्दल आपुलकी व जिव्हाळा निर्माण झाला असून बँक नेहमीच युवकांना व उद्योजकांना व्यवसायासाठी कर्ज पुरवठा करून प्रोत्साहित करत असल्याचे यावेळी दिसून आले आज गावातील लोकांना पीएमजीपी व सीएमजीपी तसेच विविध प्रकारचे पीक कर्ज असतील त्या सर्वांबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली..
यावेळी गावचे पोलीस पाटील काकाजी आगळे तसेच सरपंच अनुरथ दुधभाते प्रगतशील शेतकरी दत्ता रणदिवे,किशोर साळुंखे,रमण आगळे,काका शेलार,रावण शीत्रे, पांडुरंग आगळे, रमेश माने यांच्यासह गावातील नागरिक युवक व शेतकरी मोठ्या संख्येने हजर होते. बँकेच्या वतीने हा जो आज अनोखा कार्यक्रम गावातील राबविण्यात आला आहे त्याबद्दल गावातील नागरिकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे
0 टिप्पण्या