Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

संवेदनाशून्य सरकारला जाग देण्यासाठी धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नत्याग, मुंडण आणि प्रहारचा गर्जना आंदोलन!"


 प्रतिनिधी....मनोज जाधव 


"संवेदनाशून्य सरकारला जाग देण्यासाठी धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नत्याग, मुंडण आणि प्रहारचा गर्जना आंदोलन!"


दि. 08 जून 2025 पासून श्री क्षेत्र गूळगुंजी (मोझरी) येथे सुरू असलेल्या बेमुदत आमरण उपोषणाला आज सातवा दिवस उलटूनही शासनाकडून कोणताही ठोस निर्णय घेण्यात आलेला नव्हता. या शासनाच्या गलथान आणि असंवेदनशील भूमिकेचा तीव्र निषेध करण्यासाठी प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्यावतीने धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज दि. 14 जून 2025 रोजी आक्रमक लाक्षणिक आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनाची ठळक वैशिष्ट्ये:

दिव्यांग बांधवांनी अन्नत्याग आंदोलनात सहभाग घेतला.

मुंडण करून सरकारच्या संवेदनाशून्य धोरणांचा निषेध व्यक्त करण्यात आला.

आंदोलन स्थळी प्रहारच्या कार्यकर्त्यांनी घोषणा देत शासनाचा जाब विचारला.

या आंदोलनाच्या मुख्य मागण्या:

1. दिव्यांग व विधवा महिलांना ₹6000/- मासिक मानधन

2. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी व हमीभावावर 20% अनुदान


3. बेरोजगार युवकांना रोजगार अथवा सन्मानजनक बेरोजगारी भत्ता

4. मनरेगा अंतर्गत मजुरी ₹500/- प्रतिदिन


5. शेतमजुरी MREGS अंतर्गत समाविष्ट करणे

6. गायीच्या दुधाला ₹50/- व म्हशीच्या दुधाला ₹60/- दर देणे

7. खत अनुदान, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे वेतन प्रश्न, निवासी अतिक्रमण नियमन, कांदा निर्यात धोरण, ऊस दर, मेंढपाळ व मच्छीमार धोरण, ग्रामीण घरकुल इत्यादी संदर्भातील निर्णय


शासनाकडून लेखी उत्तर प्राप्त!


आज सायंकाळी मिळालेल्या महसूल मंत्री श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अधिकृत पत्रात पुढील आश्वासने देण्यात आली:


1. शेतकरी कर्जमाफीसाठी 15 दिवसांत उच्चस्तरीय समिती नेमण्यात येईल, व समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर निर्णय घेऊन वसुली थांबवली जाईल व नवीन कर्जवाटपाबाबत निर्णय घेतला जाईल.


2. दिव्यांगांच्या मानधन वाढीबाबत 30 जूनच्या अर्थसंकल्पात तरतूद केली जाईल.



3. वरील सर्व मागण्यांवर मुख्यमंत्री व संबंधित मंत्र्यांसोबत बैठक घेऊन निर्णय लवकरात लवकर घेतले जातील.




प्रहारचा इशारा कायम!


प्रहारच्या धाराशिव जिल्हाध्यक्ष मयूर काकडे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “हे केवळ प्रारंभ आहे. जर शासनाने फक्त कागदी आश्वासनांवरच भूमिका ठेवली, तर येत्या काळात महाराष्ट्रात चक्काजाम, साखळी उपोषण, जिल्हाधिकारी घेराव, आणि राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. प्रहार झुकत नाही – झुकवतो!”

जनतेच्या हक्कांसाठी प्रहारचा निर्धार – न्यायासाठी शेवटपर्यंत लढा!


सदरील आंदोलन जिल्हाध्यक्ष मयुर काकडे यांच्या नेतृत्वात झाले या आंदोलनात 

बाळासाहेब कसबे जमीर शेख बाळासाहेब पाटील महेश माळी , शिवाजी चव्हाण,महादेव चोपदार , चित्रा शिंदे, गोकर्ण कोळगे, इसाक शेख, तानाजी मगर, दत्ता पवार, चव्हाण विठ्ठल, धोंडीराम राठोड दत्ता कोळगे उत्तम शिंदे दिनेश पोद्दार   सुनील मगर आप्पा उपरे अभिजीत साळुंखे कालू जाधव मारुती वाघमारे कैलास यादव गणेश शिंदे नारायण साखरे रमेश सावंत नितीन सगरे पैगंबर मुलानी शिवाजी पोतदार सचिन डोंगरे शिवाजी चव्हाण रामदास मते हरिदास कुंभार सचिन शिंदे शशिकांत गायकवाड दशरथ भाकरे आत्माराम बनसोडे अनिल महाबोले दिगंबर गाढवे बजरंग गव्हाळे नितीन मुळे नवनाथ कचार आकाश गलांडे राजेंद्र देशमुख नागराज मसरे रामेश्वर मदने नरहरी ढेकणे गौतम दुधे विकास शिरसागर तुकाराम कदम नारायण लोंढे हेमंत उंदरे अभिजीत साळुंखे मलताबाई कोळगे राणी मुसळे गणेश पांढरे इंद्रजीत मिसळ जमीर शेख नागनाथ वाघमारे संतोष माळी रूपाली शिरसागर सूर्यकांत इंगळे रवी शित्रे प्रशांत भांजे तसेच जिह्यातील पदधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या