प्रतिनिधी....मनोज जाधव
बीड (प्रतिनिधी) – स्वर्गीय अण्णासाहेब पाटील विकास फाऊंडेशन यांच्या वतीने बीड येथे मराठवाडा विभागीय कार्यालयाचा भव्य शुभारंभ महामंडळ,
स्वर्गीय अण्णासाहेब पाटील
महाराष्ट्रात आत्तापर्यंत 1 लाख 38 हजार उद्योजक निर्माण...
मराठवाड्यात 38 हजार उद्योजक निर्माण
मराठा समाजासाठी आर्थिक व सामाजिक उन्नतीचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून हे कार्यालय सुरू केले जात आहे. महाराष्ट्र शासनाने मराठा समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी "अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ" स्थापन केले असून, या महामंडळामार्फत शासकीय योजनांचे लाभ मराठा समाजातील नागरिकांपर्यंत पोहचवण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत.
महामंडळाचे अध्यक्ष श्री नरेंद्र पाटील
या कार्यालयाच्या माध्यमातून विविध योजनांची माहिती, मार्गदर्शन व कर्जसुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मराठवाड्यातील विशेषतः बीड व आसपासच्या जिल्ह्यांतील युवक व उद्योजकांना यातून मोठा फायदा होणार आहे.
या उद्घाटन सोहळ्याचे मुख्य आयोजक मा. श्री. नरेंद्र अण्णासाहेब पाटील (अध्यक्ष – अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ व फाउंडेशन, महाराष्ट्र) हे असून, कार्यक्रमाचे प्रमुख संयोजक म्हणून श्री. खंडू भारतराव राऊत, श्री. रवी संतराम शिंदे आणि श्री. सतीश रघुनाथ शिंदे यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.
कार्यक्रम स्थळ:
जालना रोड, आर.सी.आर.सी.आय बँकेच्या वरचा मजला, हिना हॉटेल समोर, बीड.
महाएकत्र लाभार्थी मेळावा:
सकाळी ११:०० वा. यशवंतराव चव्हाण सभागृह, बीड.
मराठा समाजातील सर्व नागरिकांनी या शुभकार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
धाराशिव जिल्ह्यातील जास्तीत जास्त मराठा बांधवांनी या कार्यक्रमाला उपस्थित रहावे असे आवाहन धाराशिव चे कर्तव्यदक्ष जिल्हाध्यक्ष श्री खंडू राऊत यांनी केले आहे
0 टिप्पण्या